कावळ्याला जीवदान.!

          नांदगाव-: संतोष कांदे
      पतंग उडवणाऱ्यांचे शौक प्राणी,पक्षांच्या जीवावर बेतत असल्याच्या अनेक घटना घडतात.याच पद्धतीची घटना शहरातील गणेशनगर परिसरात घडली,मात्र सुदैवाने सामाजिक कार्यकर्त्या संगिता सोनवणे यांच्या समयसूचकता व धाडसाने या कावळ्याला जीवदान मिळाले.
       याबाबत अधिक असे या परिसरातील एका वृक्षावर एक कावळा जिवाच्या आकांताने ओरडत असल्याचे संगिता यांना दिसले.निरखून बघितले असता,पतंगाच्या मांज्याचा घट्ट गळफास बसलेला होता,त्यामुळे हा कावळा ओरडण्या पलीकडे काहीही करू शकत नव्हता,म्हणून त्यांनी याबाबत जवळच उभ्या असलेल्या मुलांना सांगितले.मात्र या मुलांनी दुर्लक्ष केले.तेव्हा संगीता सोनवणे यांनी या झाडावर चढण्याचा प्रयत्न केला,पण त्यांना शक्य झाले नाही.
     या कावळ्याचा जीव वाचवायचाच असे ठरवून त्या मग शेजारच्या तीन मजली इमारतीच्या गच्चीवर गेल्या,व  त्या कावळ्याची पतंगाच्या मांज्यातुन तब्बल एक तास कसरत करून सुखरूप सुटका केली.त्यांच्या या धाडसाचे व भूतदयेचे कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक