Posts

Showing posts from March, 2026

कोण हरले.? कोण जिंकले.? बाजार समिती सभापती निवडणूक.!

Image
विशेष वृत्त  सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे  या नांदगाव तालुक्यातुन राज्याला पहिला मुख्यमंत्री मिळणार होता. तो म्हणजे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या रूपाने मात्र सिन्नर येथील तत्कालीन आमदार यांनी आपले मत दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पारड्यात टाकले. अन नांदगाव तालुक्याला पहिला मुख्यमंत्री मिळण्याऐवजी पहिला  महसूलमंत्री मिळाला..कै. हिरे यांच्यानंतर मात्र नांदगाव तालुक्याला आजपर्यंत एकही सत्तेचे पद मिळू शकलेले नाही. याचे फळ आजही तालुका भोगतोय. आजपर्यंत या तालुक्याला कै. हिरे  वगळता एकही मंत्रिपद मिळू शकलेले नाही. याची सल प्रत्येक तालुकावासियांच्या मनात आहे.        आजमितीस गोड बोलून सर्वांच्या अगदी विरोधकांना  ही आपलेसे केलेल्या आमदार सुहास कांदे यांच्या मंत्रिपदाबाबत फार मोठ्या अपेक्षा येथील जनतेला होत्या. मात्र त्यांचीही एका राज्यमंत्री पदाचा दर्जा  असलेल्या महामंडळावर नियुक्ती करून मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल या शक्यतेवर पाणी फिरवले गेले आहे.      वास्तविक आमदा...

एकनिष्ठचे फळ..नांदगाव बाजार समितीच्या सभापतीपदी एकनाथ सदगीर.!

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी एकनाथ सदगीर (टाकळी खुर्द ) यांची तर उपसभापतीपदी यज्ञेश कळंत्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली.        सभापती श्री. सदगीर हे जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांचे राजकारणात आल्यापासून चे समर्थक आहेत. त्यांच्या ह्या राजकीय निष्ठेचे फळ त्यांना तालुकास्तरीय संस्थेचे सभापती पदाच्या रूपाने मिळाले आहे.         नांदगांव बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर व उपसभापती अनिल  सोनवणे यांनी आवर्तननुसार राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या कार्यालयात आज रोजी सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी नांदगांव च्या सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती पदासाठी एकनाथ  सदगीर व उपसभापती पदासाठी यज्ञेश  कलंत्री यांचे प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्यचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहिर केले.           सभापती पदाच्या नामन...

देव व धर्माच्या ठिकाणी राजकारण करू नका.! हभप बाळकृष्ण महाराज.

Image
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे  या स्वयंभू देवस्थान असलेल्या श्री.क्षेत्र बेलेश्वर मंदिर विकासासाठी त्या त्या कालावधीतील आमदारांनी माझ्या शब्दाला मान देऊन विकासकामांसाठी मदत केल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार हभप बाळकृष्ण महाराज बुरकूल यांनी केले. मन्याड नदीच्या काठावर अति प्राचीन शिवमंदिर आहे. भगवान भोलेनाथच्या हरीण व शिकाऱ्याची कथा याच ठिकाणी घडल्याचे दाखले काही ग्रंथामधून आढळून येतात.दगडात असलेले स्वयंभू शिवलिंग काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांना आढळून आले होते. तेव्हा येथे एक छोटखानी मंदिर बांधण्यात आले. तत्पूर्वी या शिवलिंगावर आपोआप बेलपत्राचा अभिषेक होत असे. कारण या ठिकाणी शिवलिंगावर सावली साठी एक मोठे बेलाचे वृक्ष आहे.       आज संत तुकाराम महाराज अखंड हरीनाम सप्ताहाचा शेवटचा समारोप दिवस होता. यावेळी काल्याचे कीर्तन हभप बाळकृष्ण महाराज यांनी केले. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार, अँड. अनिल आहेर, व विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी या मंदिराच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. आणि आ...

श्री. क्षेत्र नस्तनपूर येथे एकदिवसीय अखंड हरिनाम पारायण सोहळा.!

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (नाशिक )  संतोष कांदे  श्री. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व त्यांच्याच स्वहस्ते स्थापित श्री. शनैश्वर महाराजांच्या तीर्थक्षेत्री संस्थान च्या वतीने व दानशूरांच्या सहकार्याने एक दिवशीय अखंड हरीनाम पारायण सोहळ्याचे आयोजन येत्या १८ तारखेला करण्यात आल्याची माहिती संस्थान चे अध्यक्ष तथा माजी आमदार अँड.अनिल आहेर यांनी दिली.       या सोहळ्याचे हे शतक महोत्सवी वर्ष असून, सलग शंभर वर्षांपासून हा सोहळा येथे साजरा केला जातो हे विशेष.! सन १९२६ पासून येथे या सोहळ्याचे आयोजन कै. वेडूजी पाटील (न्यायडोंगरी ), कै. रामचंद्र पवार, कै. बाळा गायकवाड (परधाडी ), कै. त्र्यंबक सुर्वे (चांदोरा ), कै. राऊत बाबा (जळगाव खुर्द ), कै. लालमन गरुड (पिंपरखेड ), कै. शामराव वेळसकर, कै. त्र्यंबकराव वाघ (पिंप्री हवेली ), यांनी सुरु केले होते. ते त्यांच्या पश्चात ही अखंडपणे सुरु ठेवण्याचे काम विद्यमान विश्वस्त मंडळ करत आहेत. ही विशेष बाब होय.          सन १९९० साली संस्थान चे प्रमुख अँड. गोविंद जोशी यांनी...