देव व धर्माच्या ठिकाणी राजकारण करू नका.! हभप बाळकृष्ण महाराज.
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
या स्वयंभू देवस्थान असलेल्या श्री.क्षेत्र बेलेश्वर मंदिर विकासासाठी त्या त्या कालावधीतील आमदारांनी माझ्या शब्दाला मान देऊन विकासकामांसाठी मदत केल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार हभप बाळकृष्ण महाराज बुरकूल यांनी केले.
मन्याड नदीच्या काठावर अति प्राचीन शिवमंदिर आहे. भगवान भोलेनाथच्या हरीण व शिकाऱ्याची कथा याच ठिकाणी घडल्याचे दाखले काही ग्रंथामधून आढळून येतात.दगडात असलेले स्वयंभू शिवलिंग काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांना आढळून आले होते. तेव्हा येथे एक छोटखानी मंदिर बांधण्यात आले. तत्पूर्वी या शिवलिंगावर आपोआप बेलपत्राचा अभिषेक होत असे. कारण या ठिकाणी शिवलिंगावर सावली साठी एक मोठे बेलाचे वृक्ष आहे.
आज संत तुकाराम महाराज अखंड हरीनाम सप्ताहाचा शेवटचा समारोप दिवस होता. यावेळी काल्याचे कीर्तन हभप बाळकृष्ण महाराज यांनी केले. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार, अँड. अनिल आहेर, व विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी या मंदिराच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. आणि आमदार कांदे यांचे योगदान तर एखाद्या देवापेक्षा कमी नाही असेही ते म्हणाले.
तसेच काल्याचे कीर्तन करताना त्यांनी मनुष्याला इंद्रियावर विजय मिळवता आला पाहिजे मात्र ही फार अवघड गोष्ट आहे. जे देव आणि ऋषींना ही ही शक्य झाले नाही.ते मानवाला कसे शक्य होणार.? हे त्यांनी देवादीकांच्या काळातील अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.या अखंड हरीनाम सप्ताहाला प्रारंभ होऊन ४७ वर्षाचा कालखंड उलटून गेला आहे. हा सप्ताह सुरु करण्यासाठी गावातील अनेक प्रभुतीनी कष्ट घेतले आहे. असेही ते म्हणाले.
फक्त या ठिकाणी राजकारण करू नका... मदत करता आली तर करा.. मात्र देव अन राजकारण यात गफलत करू नका असे त्यांनी यावेळी भावनिक होऊन सांगितले. यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन सांगता करण्यात आली. या सप्ताह साठी मदत केलेल्या मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आले.
Comments
Post a Comment