Posts

आमदारांनी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्याकडे लक्ष द्यावे... मागणी.!

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे  ज्या लोहशिंगवे गावाने आमदार सुहास कांदे यांना नांदगाव तालुक्यात पहिले राजकीय पाऊल टाकण्यास मदत केली, आज त्याच गावातून आमदार कांदे यांनी आमच्या गाव व परिसरातील रस्त्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे.     या गावाला शिवार रस्त्यांचा फार मोठा प्रश्न भेडसावत आहे. आमदारांनी काही नाही केले तरी चालेल मात्र आमच्या या रस्त्यांचा प्रश्न सोडवला तरी खूप उपकार होतील अशी प्रतिक्रिया उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.    आमदार कांदे यांनी नांदगाव मतदार संघात भगिरथ प्रयत्नाने विकासाची गंगा आणली आहे. याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र आता आमदारांनी ग्रामीण भागातील रस्त्याच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे व त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे असा सुरु आळवला जात आहे.     मतदार संघातील अनेक गावात या छोट्या छोट्या रस्त्यांचा प्रश्न सद्यस्थितीत बिकट बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे एक दिव्य बनले आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेल्या सुहास कांदे यांनी मतदार संघातील या रस्त्या...

पारंपारिक संस्कृतीचा आदर करणारा आमदार लाभलाय नांदगाव मतदार संघाला. !

Image
सा.शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे       पुरातन काळापासून हिंदू धर्माच्या चालत आलेल्या प्रथा, परंपरा आता लोप पावत चालल्या आहेत. मात्र या महाराष्ट्रात असे काही हिंदू धर्मीय लोकप्रतिनिधी आहेत कि जे ह्या प्रथा, परंपरेची जोपासना करत आहेत. त्यात नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.       नुकतीच नांदगाव शहरातील एकविरा माता ची सात दिवसीय यात्रा संपन्न झाली. त्यात कांदे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने तन मन धनाने सहभाग नोंदवला.         मंगळवारी सायंकाळी किन्नर समाजाचे महामंडलेश्वर पायल नंदगिरी जी तसेच शेकडो किन्नर व देवीच्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घेतला.आमदार सुहास  कांदे व सौ अंजुमकांदे यांनी यावेळी देवीची मनोभावी आरती करत जागरणाच्या कार्यक्रमात पूर्णवेळ उपस्थिती नोंदवली.       सनातन हिंदू धर्माची परंपरा जपणे तसेच किन्नर समाजाला सतत मानपान देण्याचे कार्य आण्णा व ताई करत असतात जे को...

नांदगाव तालुक्याची वाटचाल हुकूमशाही च्या दिशेने होतेय का. ?

Image
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे  प्रभू श्री राम यांच्या पवित्र चरण स्पर्शाने पावन झालेला हा नांदगाव तालुका... भगवान भोलेनाथ यांच्या कैक वर्ष निवास केल्याने पवित्र झालेला हा मतदार संघ... मग श्री क्षेत्र चंदनपुरी असो वा नस्तनपूर... या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असलेले सुहास कांदे आजमितीस सर्वरार्थाने युगपुरुष ठरले आहेत.       आमदार कांदे यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे नांदगाव मतदार संघ सध्या तेजोमय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांना सोबत घेऊन चालण्याची पद्धत फार लोकांना आवडत नाही. हि पद्धत त्यांनी बदलायला हवी. असे लोक खाजगीत सांगतात.      सर्व समाजाचा, जाती धर्माचा विचार करून कार्य करणारा आमदार आपल्याला लाभलाय.. याचा मनस्वी आनंद आहे. मात्र सरमिसळ करणारा आमदार नको अशी भूमिका या सर्वांची आहे. 

नांदगाव विधानसभा मतदार संघाचा धुरंधर...!

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगा व (नाशिक ) संतोष कांदे  भारताचे बापूजी म्हणजेच महात्मा गांधी यांनी नांदगाव मध्ये गुप्ता कुटुंबाकडे काही दिवस वास्तव्य केले. त्या नांदगाव विधानसभा मतदार संघाची धुरा आमदार सुहास कांदे यांच्या खांद्यावर आहे. आमदार कांदे ही  सर्वांच्या पसंतीस उतरलेला आमदार असल्याने त्यांनीही पूर्ण तालुका काबीज केला असल्याचे दिसून येते.      मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बघितली तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी गत झाली आहे. आमदारांनी या रस्त्यांवर एकदा तरी प्रवास करावा म्हणजे त्यांना सामान्य ग्रामस्थांच्या समस्याची जाणीव होईल. सामान्य ग्रामस्थांची फार मोठी अपेक्षा नसते.आमदारांकडून.... फक्त जीवनावश्यक सोयी सुविधा मिळाल्या तरी ग्रामस्थ समाधानी होतात.      जळगाव बुद्रुक फाटा ते गाव रस्ता अत्यंत खराब झाला आहे.माणिकपुंज धरण ते गावात पाईप लाईन आणलेल्या शेतकऱ्यांनी हा रस्ता जागोजागी खोदून टाकल्याने या रस्त्यावर गाडी चालवणे  म्हणजे एक दिव्यच आहे. या रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.     जळग...

कोण हरले.? कोण जिंकले.? बाजार समिती सभापती निवडणूक.!

Image
विशेष वृत्त  सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे  या नांदगाव तालुक्यातुन राज्याला पहिला मुख्यमंत्री मिळणार होता. तो म्हणजे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या रूपाने मात्र सिन्नर येथील तत्कालीन आमदार यांनी आपले मत दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पारड्यात टाकले. अन नांदगाव तालुक्याला पहिला मुख्यमंत्री मिळण्याऐवजी पहिला  महसूलमंत्री मिळाला..कै. हिरे यांच्यानंतर मात्र नांदगाव तालुक्याला आजपर्यंत एकही सत्तेचे पद मिळू शकलेले नाही. याचे फळ आजही तालुका भोगतोय. आजपर्यंत या तालुक्याला कै. हिरे  वगळता एकही मंत्रिपद मिळू शकलेले नाही. याची सल प्रत्येक तालुकावासियांच्या मनात आहे.        आजमितीस गोड बोलून सर्वांच्या अगदी विरोधकांना  ही आपलेसे केलेल्या आमदार सुहास कांदे यांच्या मंत्रिपदाबाबत फार मोठ्या अपेक्षा येथील जनतेला होत्या. मात्र त्यांचीही एका राज्यमंत्री पदाचा दर्जा  असलेल्या महामंडळावर नियुक्ती करून मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल या शक्यतेवर पाणी फिरवले गेले आहे.      वास्तविक आमदा...

एकनिष्ठचे फळ..नांदगाव बाजार समितीच्या सभापतीपदी एकनाथ सदगीर.!

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी एकनाथ सदगीर (टाकळी खुर्द ) यांची तर उपसभापतीपदी यज्ञेश कळंत्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली.        सभापती श्री. सदगीर हे जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांचे राजकारणात आल्यापासून चे समर्थक आहेत. त्यांच्या ह्या राजकीय निष्ठेचे फळ त्यांना तालुकास्तरीय संस्थेचे सभापती पदाच्या रूपाने मिळाले आहे.         नांदगांव बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर व उपसभापती अनिल  सोनवणे यांनी आवर्तननुसार राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या कार्यालयात आज रोजी सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी नांदगांव च्या सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती पदासाठी एकनाथ  सदगीर व उपसभापती पदासाठी यज्ञेश  कलंत्री यांचे प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्यचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहिर केले.           सभापती पदाच्या नामन...

देव व धर्माच्या ठिकाणी राजकारण करू नका.! हभप बाळकृष्ण महाराज.

Image
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे  या स्वयंभू देवस्थान असलेल्या श्री.क्षेत्र बेलेश्वर मंदिर विकासासाठी त्या त्या कालावधीतील आमदारांनी माझ्या शब्दाला मान देऊन विकासकामांसाठी मदत केल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार हभप बाळकृष्ण महाराज बुरकूल यांनी केले. मन्याड नदीच्या काठावर अति प्राचीन शिवमंदिर आहे. भगवान भोलेनाथच्या हरीण व शिकाऱ्याची कथा याच ठिकाणी घडल्याचे दाखले काही ग्रंथामधून आढळून येतात.दगडात असलेले स्वयंभू शिवलिंग काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांना आढळून आले होते. तेव्हा येथे एक छोटखानी मंदिर बांधण्यात आले. तत्पूर्वी या शिवलिंगावर आपोआप बेलपत्राचा अभिषेक होत असे. कारण या ठिकाणी शिवलिंगावर सावली साठी एक मोठे बेलाचे वृक्ष आहे.       आज संत तुकाराम महाराज अखंड हरीनाम सप्ताहाचा शेवटचा समारोप दिवस होता. यावेळी काल्याचे कीर्तन हभप बाळकृष्ण महाराज यांनी केले. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार, अँड. अनिल आहेर, व विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी या मंदिराच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. आणि आ...