नांदगाव विधानसभा मतदार संघाचा धुरंधर...!
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा
भारताचे बापूजी म्हणजेच महात्मा गांधी यांनी नांदगाव मध्ये गुप्ता कुटुंबाकडे काही दिवस वास्तव्य केले. त्या नांदगाव विधानसभा मतदार संघाची धुरा आमदार सुहास कांदे यांच्या खांद्यावर आहे. आमदार कांदे ही सर्वांच्या पसंतीस उतरलेला आमदार असल्याने त्यांनीही पूर्ण तालुका काबीज केला असल्याचे दिसून येते.
मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बघितली तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी गत झाली आहे. आमदारांनी या रस्त्यांवर एकदा तरी प्रवास करावा म्हणजे त्यांना सामान्य ग्रामस्थांच्या समस्याची जाणीव होईल. सामान्य ग्रामस्थांची फार मोठी अपेक्षा नसते.आमदारांकडून.... फक्त जीवनावश्यक सोयी सुविधा मिळाल्या तरी ग्रामस्थ समाधानी होतात.
जळगाव बुद्रुक फाटा ते गाव रस्ता अत्यंत खराब झाला आहे.माणिकपुंज धरण ते गावात पाईप लाईन आणलेल्या शेतकऱ्यांनी हा रस्ता जागोजागी खोदून टाकल्याने या रस्त्यावर गाडी चालवणे म्हणजे एक दिव्यच आहे. या रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
जळगाव बुद्रुक म्हणजे आमदारांचे गाव असे ग्रामस्थ सांगतात.. मग आमदारांनी जळगावकरांच्या ह्या समस्या सोडवव्यात अशी मागणी होत आहे.
Comments
Post a Comment