नांदगाव बाजार समितीत फेडरेशनकडून मका, बाजरी, ज्वारी खरेदीस सुरुवात...
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा नांदगांव (नाशिक ) संतोष कांदे नांदगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून जिल्हा मार्केटींग फेडरेशन अंर्तगत नांदगांव येथे मका , बाजरी , ज्वारी खरेदी केंद्र सुरू होणार असून नांव नोंदणी ३० नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती नांदगांव बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, शनैश्वर खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास आहेर यांनी दिली. खरीप हंगाम २०२५-२६ या चालू हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे नांदगांव येथे धान्य खरेदी केंद्र सुरू करणे बाबत नांदगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी सातत्याने पाठपुरावा करून नांदगांव येथे खरेदी केंद्रास मान्यता मिळवून दिलेली आहे. त्यानुसार श्री शनैश्वर नांदगांव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. नांदगांव यांची सब एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून मका, बाजरी व ज्वारी हे धान्य सदर केंद्रावर खरेदी केले जाणार असून त्यापूर्वी नांव नोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणीची मुदत ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम राहणार आहे. ...