नगरपरिषद मध्ये जे काही बरे वाईट घडेल त्याची जबाबदारी माझी नाही.- मदन हिरे
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा नांदगाव नगरपरिषदच्या इतिहासात प्रथमच येथे दीर्घकाळ सेवा केलेल्या कर्मचाऱ्याचा मुलगा आमदार सुहास कांदे यांच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष झालाय. हा खूप मोठा बहुमान मला मिळालाय.मी त्याला (नगराध्यक्ष सागर हिरे ) काहीही शिकवणार नाही. त्यामुळे नगरपरिषद मध्ये या काळात जे काही बरे वाईट घडेल याची जबाबदारी माझी नाही.असे स्पष्ट मत लोकनियुक नगराध्यक्ष सागर हिरे यांचे वडील तथा या नगरपरिषद चे सेवानिवृत्त कर्मचारी मदन हिरे यांनी व्यक्त केले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा पदग्रहण सोहळा नगरपरिषद आवारात आज पार पडला. त्यावेळी आमदार श्री. कांदे यांच्या खास आग्रहास्तव मदन हिरे यांना मनोगत मांडण्याचे सुचवण्यात आले. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये जोरदार हशा उसळला होता. मात्र जाणकार मंडळीमध्ये वेगळीच चर्चा रंगल्याचे दिसून आले. तर माजी आमदार अँड अनिल आहेर म्हणाले की, आमदार कांदे यांच्यामुळे तुम्हाला ही सुवर्णं संधी मिळाली आहे.जनतेची सेवा करून या संधीचे सोने करा. आणि सर्वात महत्वाचे आपल...