व्ही. एन. नाईक विद्यालयात स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी

सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक विद्यालयात लोकनेते तथा केंद्रीय ग्रामविकासमंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
  यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्व. मुंडे यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगत व्यक्त केले. व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विश्वनाथ कांदे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप चे जिल्हा नेते पुरुषोत्तम निकम (महाराज ) उपस्थित होते.
   यावेळी प्रमुख पाहुण्यांनी ही ना. मुंडे साहेबांबरोबरच्या आठवणी जागवल्या. कार्यक्रमास गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम भालेराव, शिक्षक बी. एस. पवार, एस. बी. जाधव, के. व्ही. शिंदे,आर. एस. चांदवडे,यांनी केले. तर सूत्रसंचालन ज्योती गिते यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक