सिईओ ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून एकल वधू -वरांचा विवाह सोहळा संपन्न.!
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आंतरजातीय एकल विधुर महिला एकल पुरुष विवाह मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून, व प्रमुख उपस्थितीत आज नागापूर येथे पार पडला. येथील एकल वर नितीन गरुड व एकल वधू प्रतिभा धुराडे यांचा शुभविवाह ग्रामपंचायतीच्या आर्थिक व सामाजिक सहकार्याने पार पडला. नितीन गरुड हे एकल पुरुष असून त्यांच्या पत्नीचे साधारण दहा वर्षा पूर्वी निधन झाले होते तेव्हापासून ते एकल जीवन जगत होते तर वधू श्रीमती प्रमिला धुराडे यांचे पतीचे अपघाती निधन झाले होते. लोकनियुक्त सरपंच राजेंद्र पवार व ग्रामपंचायत अधिकारी दिलीप निकम यांनी ही बाब हेरली मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा एकल पणा कमी व्हावा यासाठी संबंधित चर्चा केली त्यानंतर त्यांना विवाहासाठी तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पवार यांची परवानगी घेऊन विवाहाचे नियोजन केले...