सिईओ ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून एकल वधू -वरांचा विवाह सोहळा संपन्न.!
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आंतरजातीय एकल विधुर महिला एकल पुरुष विवाह मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून, व प्रमुख उपस्थितीत आज नागापूर येथे पार पडला.
येथील एकल वर नितीन गरुड व एकल वधू प्रतिभा धुराडे यांचा शुभविवाह ग्रामपंचायतीच्या आर्थिक व सामाजिक सहकार्याने पार पडला. नितीन गरुड हे एकल पुरुष असून त्यांच्या पत्नीचे साधारण दहा वर्षा पूर्वी निधन झाले होते तेव्हापासून ते एकल जीवन जगत होते तर वधू श्रीमती प्रमिला धुराडे यांचे पतीचे अपघाती निधन झाले होते.
लोकनियुक्त सरपंच राजेंद्र पवार व ग्रामपंचायत अधिकारी दिलीप निकम यांनी ही बाब हेरली मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा एकल पणा कमी व्हावा यासाठी संबंधित चर्चा केली त्यानंतर त्यांना विवाहासाठी तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पवार यांची परवानगी घेऊन विवाहाचे नियोजन केले. व आज सीइओ श्री. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर विवाह सोहळा पार पडला.
अत्यंत थाटामाटात साजऱ्या झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी ग्रामस्थ शासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदर विवाह निमित्त ग्रामपंचायत नागापूर यांनी नावीन्य पूर्ण उपक्रमांतर्गत चालू केलेली सरपंच शुभमंगल योजनेअंतर्गत ११००० रु. चा धनादेश ग्रामपंचायती द्वारे देण्यात आला.तदनंतर लग्नात सुग्रास जेवणाची संपूर्ण व्यवस्था ग्रामपंचायत नागापूर मार्फत करण्यात आली. सदर विवाह हा ग्रा. प. कार्यालया समोर मंडप टाकून व आमंत्रण पत्रिका छापून संपन्न झाला.
विवाहप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी दिलीप निकम व मनेश भाबड यांनी अंतरपाठ धरला व प्रमुख वऱ्हाडी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार साहेब, उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती. डॉ. वर्षा फडोळ नांदगाव गटविकास अधिकारी श्रीकिसन खातळे,आमदार सुहास कांदे यांच्यातर्फे प्रतिनिधी म्हणून फरहान खान, तसेच जिल्हा परिषदेचे व प. स. नांदगाव चे सर्व खाते प्रमुख राजकीय मान्यवर उपस्थित होते. सदर विवाह नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पवार यांनी नागापूर ग्रामपंचायतींचे कौतुक केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले.
Comments
Post a Comment