नांदगाव बाजार समितीच्या व्यापारी गट संचालकपदी गोकुळ कोठारी यांची निवड.!
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव नाशिक -: संतोष कांदे
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गटातील रिक्त झालेल्या संचालकपदी गोकुळ कोठारी यांची निवड करण्यात आली.
बाजार समितीचे मार्गदर्शक आमदार सुहास कांदे,माजी आमदार अँड. अनिल आहेर व जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या सूचनेनुसार घाटमाथ्यावरील बोलठाण गोकुळ कोठारी यांची निवड करण्यात आली.व्यापारी गटाचे यापूर्वीचे संचालक अमोल नावंदर यांनी राजीनामा दिल्याने सदर रिक्त जागेवर सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार संचालक मंडळाने ठरावाद्वारे ही निवड केली.
या निवडीप्रसंगी उपस्थित राहिलेल्या समृद्धी बँकेच्या चेयरमन सौ.अंजुम सुहास कांदे, माजी आ.अँड.आहेर, श्री. कवडे यांचे हस्ते समितीने निर्माण केलेल्या शेतकरी निवास व सभागृह नुतनीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.त्याचबरोबर यावेळी नांदगांव बाजार समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांसह नांदगांव चे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे , माजी पं.स.सभापती विलास आहेर , माजी संचालक विष्णू निकम , अनिल तात्या रिंढे , गुलाब भाबड , किरण कांदे , रिखबशेठ पाटणी आदिंचा सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित संचालक गोकुळ कोठारी व माजी संचालक अमोल नावंदर यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्य़क्रम प्रसंगी बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर , उपसभापती अनिल सोनवणे , संचालक तेजदादा कवडे , साहेबराव पगार , बंडू पाटील , सतिष बोरसे , पोपट सानप, समाधान पाटील , दिपक मोरे, जीवन गरुड , अनिल वाघ , यज्ञेश कलंत्री , निलेश इपर , सौ. अलकाताई कवडे , आदि संचालकांसह बाळकाका कलंत्री, सुनिल जाधव , प्रकाश शिंदे , नगरसेवक दिपक पांडव , दत्तराज छाजेड , राजाभाऊ देशमुख , दत्तात्रय निकम , नुतन कासलीवाल , रफिक पठाण , अमित नहार , राजाभाऊ जगताप , उदय पाटील , बाळासाहेब कवडे , सचिव अमोल खैरनार यांचेसह नांदगांव , बोलठाण व न्यायडोंगरी येथील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाजार समितीचे अधिकारी बाबासाहेब साठे यांनी केले.
Comments
Post a Comment