अजित दादांचा अपघात.... अन सोशल मीडियातल्या अफ़वा.!
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा 'कामाचा माणूस' अशी सर्वदूर ओळख असलेले अजितदादा पवार यांचे विमान अपघातात त्यांच्याच कर्मभूमी बारामतीत दुःखद मृत्यू झाला. हे जगजाहीर असतानाही सोशल मीडियातून मात्र लोकभावनांचा अनादर करण्याचा प्रयत्न विविध ए. आय.व्हिडीओ च्या माध्यमातून सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.
फेसबुक, इंस्टाग्राम, व अन्य सोशल माध्यमातून विविध प्रकारचे व्हिडिओ तयार करून जनमाणसात संभ्रम निर्माण केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही व्हिडिओ मधून अजितदादांना विमान कोसळण्याची माहिती मिळाली म्हणा किंवा शंका आली म्हणून त्यांनी पॅराशूट च्या साहाय्याने विमानातून उडी घेतली अन ते सुखरूप अज्ञातस्थळी पोहचले.काही गोष्टींचा खुलासा त्यांना करायचा असल्याने त्यांनी हे पाऊल उचल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे.
दुसऱ्या काही पोस्टमध्ये विमानात सहा व्यक्ती बसल्या होत्या, तर मृत्यूदेह फक्त पाच च कसे.? यावर भाष्य करण्यात आले आहे. एका पोस्ट मध्ये व्यक्ती जळल्यानंतर त्याचे मृत शरीर फुगू कसे शकते.? जर व्यक्तीचा जळून मृत्यू होऊ शकतो तर कागद का जळाले नाहीत.? असा ही सवाल करण्यात येऊन शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान कालपासून एक नवीन अफ़वा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. की, दिवंगत अजितदादा ज्या विमानाने बारामतीला येत होते, त्या विमानाचा मागचा कलर हिरवा होता तर अपघातग्रस्त विमानाचा मागचा कलर लाल आहे.
काही वर्षांपूर्वी केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यू नंतर काही दिवस अशाच अफ़वा पसरल्या होत्या. पण काही दिवसानंतर त्यावर पडदा पडला. ह्या दोन्ही घटनांमधून आजचा सोशल मीडिया लोकभावना लक्षात घेऊन लोकांच्या भावनांशी कसा खेळतो याचे विदारक चित्र या निमित्ताने समोर आले आहे. मात्र हे करत असताना संबंधित व्यक्तीचे कुटुंबं व त्यांना मानणारा वर्ग यांच्या मनात भावनेचे खेळ सुरु होत असतो हे कुणीच लक्षात घेताना दिसत नाही.
त्या मृत व्यक्तीच्या प्रेमापोटी म्हणा किंवा आदरापोटी ह्या घटनांवर काही क्षण का होईना विश्वास बसायला लागतो. अन मन त्या दृष्टीने विचार करायला प्रवृत्त होते. नेमक्या ह्याच भावनिक गोष्टीचा विचार करून सोशल मीडिया अशा प्रकारचे कृत्य सोशल माध्यमातून जनतेसमोर आणत असावेत.?
Comments
Post a Comment