कासारीत चर्चा सिंह आल्याची.... पाणी टंचाई चा गंभीर प्रश्न जळगाव बुद्रुक ला

सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव नाशिक - संतोष कांदे 
नांदगाव -: तालुक्यातील कासारी येथे चक्क सिंह अन त्याच्या सोबत बच्छडे ही आल्याची जोरदार अफ़वा पसरल्याने सायंकाळ नंतर जणू या परिसरात कर्फ्यू लागत असल्याचा आभास निर्माण होत आहे. मात्र यामुळे जळगाव बुद्रुकची पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
    काही दिवसापूर्वी जळगाव बुद्रुक येथे बिबट्याचे आगमन झाले भास्कर कांदे यांच्या दोन जनावरांचा फडशा पडल्यानंतर या बिबट्याने दुसऱ्याच दिवशी कासारी येथील संजय सानप यांच्या गायीचा फडशा पाडला. त्यानंतर कुठेही या बिबट्याचा संचार अथवा नुकसान केल्याची घटना घडली नाही. मात्र कासारी परिसरातील चांदेश्वरी मध्यम प्रकल्प जवळ चक्क सिंह आल्याची चर्चा जोरात सुरु आहे.
     दरम्यान या प्रकल्पाच्या खालील भागात जळगाव बुद्रुकला पाणी पुरवठा करणारी उद्भव विहीर आहे. आणि या विहिरीवर जो विजपंप आहे तो चालू बंद करण्यासाठी कासारीच्या एका तरुणाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या भागात सिंह व त्याचे बच्छडे दिसून आल्याची जोरदार अफ़वा असल्याने सदर कर्मचारी या ठिकाणी जायला तयार नाही. परिणामी जळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीने गावातील एका स्थानिक शेतकऱ्याकडून पाणी घेऊन ग्रामस्थांची गरज भागवली आहे. 

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक