नांदगाव तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी तरुण महाराष्ट्र सुरक्षा दलाचा अधिकारी..!
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
महाराष्ट्रातील आदिवासी समाज आता शिक्षणाच्या नव्या नव्या वाटा पादाक्रांत करू लागलाय. राज्य असो वा केंद्र शासनाच्या सर्वच सेवांमध्ये त्यांचे अस्तित्व जाणवू लागले आहे. ही भारताच्या नव्या निर्मितीची चाहूल आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. तालुक्याच्या घाटमाथ्यावरील लोढरे या शेवटच्या टोकावरील गावातील आदिवासी तरुणाने थेट महाराष्ट्र सुरक्षा दलात एंट्री केल्याने तालुक्याच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सन २०१० मध्ये या विशेष दलाची स्थापना करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या सरकारी कार्यालये,विमानतळ आदी गोष्टींची सुरक्षा करण्यासाठी या सुरक्षा यंत्रणेचा वापर करण्यात येतो. मुंबई पोलीस कायदा १९५१ अंतर्गत विशेष पोलीस अधिकारी म्हणून या दलातील अधिकाऱ्यांना मान्यता देण्यात आली आहे.
लोढरे ठाकर वाडी येथील रहिवासी साईनाथ बुधा पोकळे यांचे चिरंजीव पिंटू साईनाथ पोकळे याची मुंबई येथे एम.एस.एफ मध्ये निवड झाली. गावाकडील रानातली काम, काही दिवस स्थलांतरीत ऊसतोडणी कामे करून सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा हा पिंटू. अनेकदा विविध परीक्षेत अपयश आल्यांनतर पिंटू ची निवड मुंबई या ठिकाणी निवड झाली. या यशाबद्दल जि.प.शाळा लोढरे ठाकरवा डी व संपूर्ण गावाच्या वतीने पिंटूचा सत्कार करण्यात आला. यावेळी ,श्री.अहिरे विकास पोकळे, मुन्ना पोकळे, सागर पोकळे , संतोष पोकळे, उमेश चव्हाण, महेश राठोड, पप्पू राठोड, प्रकाश राठोड ,उमेश राठोड, विलास चव्हाण,दादू पोकळे, अमोल चव्हाण ,सुनील पोकळे, रवींद्र पोकळे यांच्यासह गावातील सर्व तरुण मंडळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment