विवाहेच्छुक महिला व पुरुषांनी नवचेतना अभियानात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मेळावा यशस्वी करावा - सीईओ ओमकार पवार
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
नाशिक जिल्हा परिषद च्या माध्यमातून तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून नवचेतना अभियान अंतर्गत एकल महिला विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यात इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मेळावा यशस्वी करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले आहे.
रविवार दि. १४ डिसेंबर रोजी नाशिक येथील जिल्हा परिषदच्या नूतन इमारतीच्या बहुउद्देशीय सभागृहात हा मेळावा संपन्न होणार आहे.यासाठी इच्छुकांनी नावनोंदणी करणे गरजेचे आहे.
नाशिक जिल्हा परिषद आयोजित राज्यात प्रथमच एकल महिलांच्या पुनर्विवाहासाठी सर्व जातीय, मोफत वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत जिल्हा परिषद नवीन इमारतीच्या बहुउद्देशीय सभागृहात हा मेळावा संपन्न होणार आहे. पुनर्विवाहासाठी इच्छुक असलेल्या एकल महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी शेवटी केले आहे.
Comments
Post a Comment