नगरपरिषद मध्ये जे काही बरे वाईट घडेल त्याची जबाबदारी माझी नाही.- मदन हिरे

सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव नगरपरिषदच्या इतिहासात प्रथमच येथे दीर्घकाळ सेवा केलेल्या कर्मचाऱ्याचा मुलगा आमदार सुहास कांदे यांच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष झालाय. हा खूप मोठा बहुमान मला मिळालाय.मी त्याला (नगराध्यक्ष सागर हिरे ) काहीही शिकवणार नाही. त्यामुळे नगरपरिषद मध्ये या काळात जे काही बरे वाईट घडेल याची जबाबदारी माझी नाही.असे स्पष्ट मत लोकनियुक नगराध्यक्ष सागर हिरे यांचे वडील तथा या नगरपरिषद चे सेवानिवृत्त कर्मचारी मदन हिरे यांनी व्यक्त केले.
       नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा पदग्रहण सोहळा नगरपरिषद आवारात आज पार पडला. त्यावेळी आमदार श्री. कांदे यांच्या खास आग्रहास्तव मदन हिरे यांना मनोगत मांडण्याचे सुचवण्यात आले. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये जोरदार हशा उसळला होता. मात्र जाणकार मंडळीमध्ये वेगळीच चर्चा रंगल्याचे दिसून आले.
    तर माजी आमदार अँड अनिल आहेर म्हणाले की, आमदार कांदे यांच्यामुळे तुम्हाला ही सुवर्णं संधी मिळाली आहे.जनतेची सेवा करून या संधीचे सोने करा. आणि सर्वात महत्वाचे आपले पाय जमिनीवरच असू द्या.! कारण तुम्ही तुमच्या कार्यातून जो काही ठसा उमटवाल त्याचे बरे वाईट परिणाम नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच पर्यायाने आमदार कांदे यांना भोगावे लागतील. तर जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी समृद्धी बँकेच्या चेयरमन सौ. अंजुम कांदे यांच्या भाषणाचा धागा पकडून म्हणाले की, तुम्ही नोकरीला लागलात ही गोष्ट खरी असली तरी तुम्ही बिनपगारी नोकरीला आहात. काम असे करा की, लोकांनी तुम्हाला दीर्घकाळ लक्षात ठेवले पाहिजे. यासाठी त्यांनी तत्कालीन सी.ई. ओ. भोंगळे यांचे उदाहरण दिले. 
यावेळी आमदार सुहास कांदे म्हणाले की, येत्या पाच वर्षात भूमिगत गटारी, शहराची हद्दवाढ, या शिवाजी चौकाचा कायापालट, यासंह अनेक विकासकामे करणार असल्याचे सांगून, जे कुणी नगरसेवक जनतेसाठी उपलब्ध असणार नाहीत. प्रसंगी त्यांचा राजीनामा घेण्यास ही मी कचरणार नाही. असे स्पष्ट केले.
       यावेळी सौ. अंजुम कांदे, जगताप सर, राजाभाऊ जगताप, दत्तराज छाजेड, शाईनाथ गिडगे, राजेंद्र पवार, विलासराव आहेर, रोहिणी मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास आमदार सुहास कांदे, सौ. अंजुम कांदे,, माजी आ. अँड. अनिल आहेर,बापूसाहेब कवडे, राजेंद्र पवार, अरुण पाटील, तेज कवडे, विलास आहेर, रमेश बोरसे,दर्शन आहेर, अर्जुन पाटील, समाधान पाटील, शाईनाथ गिडगे, दिलीप इनामदार, सतीश बोरसे, चेतन पाटील, बाळासाहेब कवडे, एकनाथ सदगीर, अनिल सोनावणे, अंकुश कातकडे, अण्णासाहेब पगार, दीपक मोरे, रमेश करवा, श्याम दुसाने,गोकुळ कोठारी, महावीर जाधव,मनोज रिंढे, नूतन कासलीवाल, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे, शिवाजी पाटील,नंदू पाटील,दत्तराज छाजेड,महेंद्र शिरसाठ विठ्ठल आहेर, डॉ. वाय. पी. जाधव, डॉ. तुसे,बालकाका कलंत्री आदीसह शहरातील, ग्रामीण भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठळक क्षणचित्रे - कार्यक्रमाच्या अगोदर नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्या पुतळ्याना पुष्पहार अर्पण...
* नगराध्यक्ष यांच्याकडून शहर विकासाची शपथ..
शिवसेनेच्या व्यासपीठावर प्रथमच काँग्रेसचे माजी आमदार अँड. अनिल आहेर यांची हजेरी व मार्गदर्शन...
आ. कांदे यांनी गत लोकप्रतिनिधीचे नाव न घेता काढला चिमटा...
यावेळी प्रास्ताविक सुनील जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन बाजार समितीचे संचालक अमोल नावंदर यांनी केले.




Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक