चिंचविहीरची सून कोपरगाव ची नगरसेविका तर निमगाव चे सागर हिरे नांदगावचे नगराध्यक्ष.!
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (nashik ) संतोष कांदे
कुठलेही पद नसताना आपण जेथे वास्तव्य करून असतो, तेथील गोरगरिबांची सेवा केली. कुणाच्याही हाकेस धावून गेलो तर स्थानिक, बाहेरचा हा मुद्दा गौण ठरतो अन राजसत्तेची वस्त्रे परिधान करण्यास मिळतात. हे नांदगाव व कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले.
नांदगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी प्रचलित राजकारण्यांना मुख्य पदाच्या उमेदवारी पासून दूर ठेवत नव्या दमाच्या व शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नांदगावकरांची अनेक छोट्या छोट्या गोष्टींची सेवा करत असलेल्या सागर हिरे यांना संधी दिली. हिरे हे मूळचे मालेगाव तालुक्यातील निमगाव चे मात्र जन्मभूमी निमगाव असली तरी कर्मभूमी नांदगाव च असल्याने गेल्या कित्येक वर्षाचा नांदगाव शहरातील वावर व आमदार कांदे यांच्यासोबतचा सहवास यामुळे नांदगाव करानी त्यांना परके मानले नाही. व थेट नगराध्यक्ष पदाच्या लढाईत त्यांना चांगल्या मतांनी संधी दिली आहे. आता आमदार कांदे यांच्या नेतृत्वाखाली या संधीचे सोने करून राजकीय कारकीर्द घडवण्याची किमया त्यांना साध्य करायची आहे.
तर जळगाव बुद्रुक पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचविहीर या छोट्याशा खेड्यातील संजना संजय उदावंत ह्या पतीसह व्यवसाय निमित्ताने कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करून आहेत. त्यांनी केलेल्या लोकोपयोगी कामांमुळे त्यांना लोकांनी निवडणूक लढण्यास भाग पाडले व निवडून ही दिले. या दोन्ही लोकप्रतिनिधीचा निमगाव, चिंचविहीर गावातील ग्रामस्थांना मोठा अभिमान वाटत असल्याचे दिसून येत आहे.
Comments
Post a Comment