आमदारांनी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्याकडे लक्ष द्यावे... मागणी.!
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
ज्या लोहशिंगवे गावाने आमदार सुहास कांदे यांना नांदगाव तालुक्यात पहिले राजकीय पाऊल टाकण्यास मदत केली, आज त्याच गावातून आमदार कांदे यांनी आमच्या गाव व परिसरातील रस्त्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे.
या गावाला शिवार रस्त्यांचा फार मोठा प्रश्न भेडसावत आहे. आमदारांनी काही नाही केले तरी चालेल मात्र आमच्या या रस्त्यांचा प्रश्न सोडवला तरी खूप उपकार होतील अशी प्रतिक्रिया उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
आमदार कांदे यांनी नांदगाव मतदार संघात भगिरथ प्रयत्नाने विकासाची गंगा आणली आहे. याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र आता आमदारांनी ग्रामीण भागातील रस्त्याच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे व त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे असा सुरु आळवला जात आहे.
मतदार संघातील अनेक गावात या छोट्या छोट्या रस्त्यांचा प्रश्न सद्यस्थितीत बिकट बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे एक दिव्य बनले आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेल्या सुहास कांदे यांनी मतदार संघातील या रस्त्यांची समस्या सोडवणे काळाची गरज बनली आहे.
आमदारांनी पाणी प्रश्न महत्वाचा मानून मनमाड शहर, नांदगाव, व 78 खेडी पाणी पुरवठा योजना साकारून पाणी प्रश्न मार्गी लागल्यात जमा आहे. मात्र गाव असो वा शहर विकास हा रस्त्याने येत असतो ही बाब मान्य करून ग्रामीण भागातील छोट्या -मोठ्या रस्त्याच्या समस्या आता मार्गी लावणे गरजेचे झाले आहे. आज पर्यंत रस्त्यांची कामे झाली असतील, व होत आहेत,मात्र संबंधित गावातील लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे कार्यकर्ते यांची एक बैठक घेऊन कोणत्या गावात रस्त्यांच्या समस्या आहेत हे समजून त्या सोडवण्यासाठी पूढाकार घेतला पाहिजे असा सुरु आळवला जात आहे. आणि आमदार कांदे यांनीही या प्रश्नाला महत्वाचा मानून प्राधान्यक्रमाने ही समस्या मार्गी लावायला हवी असे मत व्यक्त केले जात आहे.
Comments
Post a Comment