कोण हरले.? कोण जिंकले.? बाजार समिती सभापती निवडणूक.!

विशेष वृत्त 
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 

या नांदगाव तालुक्यातुन राज्याला पहिला मुख्यमंत्री मिळणार होता. तो म्हणजे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या रूपाने मात्र सिन्नर येथील तत्कालीन आमदार यांनी आपले मत दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पारड्यात टाकले. अन नांदगाव तालुक्याला पहिला मुख्यमंत्री मिळण्याऐवजी पहिला  महसूलमंत्री मिळाला..कै. हिरे यांच्यानंतर मात्र नांदगाव तालुक्याला आजपर्यंत एकही सत्तेचे पद मिळू शकलेले नाही.
याचे फळ आजही तालुका भोगतोय. आजपर्यंत या तालुक्याला कै. हिरे  वगळता एकही मंत्रिपद मिळू शकलेले नाही. याची सल प्रत्येक तालुकावासियांच्या मनात आहे.
       आजमितीस गोड बोलून सर्वांच्या अगदी विरोधकांना  ही आपलेसे केलेल्या आमदार सुहास कांदे यांच्या मंत्रिपदाबाबत फार मोठ्या अपेक्षा येथील जनतेला होत्या. मात्र त्यांचीही एका राज्यमंत्री पदाचा दर्जा  असलेल्या महामंडळावर नियुक्ती करून मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल या शक्यतेवर पाणी फिरवले गेले आहे.
     वास्तविक आमदार कांदे यांनी या नांदगाव तालुक्यातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. सर्वात महत्वाचा किंबहुना आज पर्यंत ज्या ज्या निवडणुका मनमाड पाणी प्रश्नावर लढवून जिंकल्या, त्या सर्वांचे आश्वासन  फसले. मात्र कांदे यांनी करंजवन पाणी पुरवठा योजना पूर्ण करून मनमाड चा पाणी प्रश्न सोडवला. औद्योगिक वसाहत आणली., नांदगाव शहर साठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आणली. छपन्न खेडी योजना ७८ खेडी योजना बनवली. तरीही त्यांना मंत्रिपदापासून दूर राखण्यात मित्र पक्षातील व स्वतः च्या पक्षातील नेत्यांना यश आले आहे.
        आमदार कांदे यांनी आजपर्यंत काही धाडसी राजकीय डाव टाकले अन ते यशस्वी करून दाखवले आहेत. नांदगाव नगर पालिकेच्या राजकारणात बॉस असलेल्या राजेश उर्फ बबी काका यांना अलगद बाजूला काढून सागर हिरे या ग्रामीण भागातील तरुणाला नगराध्यक्ष बनवणे असो.. वा माजी आमदार संजय पवार यांची मनमाड बाजार बाजार समितीवर सभापती म्हणून राजकीय  सोय लावणे या सर्व राजकीय घडामोडी कांदे यांनी राजकीय कौशल्याची चुणूक दाखवली. तर  या सर्वावर कडी म्हणजे काँग्रेस चे आजपर्यंत चे निष्ठावान माजी आमदार अँड. अनिल आहेर यांचे पुत्र दर्शन आहेर ला शिवसेनेत घेऊन नांदगाव बाजार समितीचा सभापती बनवून त्यांचे राजकीय भविष्य उज्वल केले.
अगदी काल जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांचे खंदे समर्थक एकनाथ सदगीर यांना सभापती पदाचा बहुमान प्राप्त झाला मात्र  हे सर्व करत असताना त्यांनी ज्यांना शब्द दिले होते.किंबहुना ह्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदारांना भक्कम साथ दिली ते जीवन गरुड, अनिल वाघ,यांना मात्र ह्या निवडीमुळे धक्का बसल्याचे चित्र आहे.
    

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक