एकनिष्ठचे फळ..नांदगाव बाजार समितीच्या सभापतीपदी एकनाथ सदगीर.!
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी एकनाथ सदगीर (टाकळी खुर्द ) यांची तर उपसभापतीपदी यज्ञेश कळंत्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सभापती श्री. सदगीर हे जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांचे राजकारणात आल्यापासून चे समर्थक आहेत. त्यांच्या ह्या राजकीय निष्ठेचे फळ त्यांना तालुकास्तरीय संस्थेचे सभापती पदाच्या रूपाने मिळाले आहे.
नांदगांव बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर व उपसभापती अनिल सोनवणे यांनी आवर्तननुसार राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या कार्यालयात आज रोजी सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी नांदगांव च्या सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती पदासाठी एकनाथ सदगीर व उपसभापती पदासाठी यज्ञेश कलंत्री यांचे प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्यचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहिर केले.
सभापती पदाच्या नामनिर्देशन पत्रावर संचालक सतिष बोरसे यांनी सुचक म्हणून तर सौ.अलका कवडे यांनी अनुमोदक म्हणून सही केली. तसेच उपसभापती पदाच्या नामनिर्देशन पत्रावर समाधान पाटील यांनी सुचक म्हणून तर जीवन गरुड यांनी अनुमोदक म्हणून सही केली.
सभापती निवडीपूर्वी संचालक मंडळाची शिवनेरी सभागृह येथे बैठक होवून संस्थेचे मार्गदर्शक तथा आमदार सुहास कांदे , सौ. अंजुम कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे , माजी आमदार अँड. अनिल आहेर यांचे प्रमुख उपस्थितीत सभापती पदावर एकनाथ सदगीर तर उपसभापती पदावर यज्ञेश कलंत्री यांचे नावावर एकमत झाले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली
.निवडणूकी वेळी संचालक तेजदादा कवडे , साहेबराव पगार , ,अर्जुन(बंडू)पाटील ,दिपक मोरे, पोपट सानप , अनिल वाघ ,गोकुळ कोठारी , निलेश इपर , आदिंसह नांदगांव नगरपरिषद नगराध्यक्ष सागर हिरे , पं.समिती माजी सभापती विलासराव आहेर , माजी जि.प.सदस्य रमूकाका बोरसे , मजूर फेडरेशन संचालक प्रमोद भाबड ,विष्णू निकम ,माजी संचालक अमोल नावंदर , शिवसेना नेते किरण कांदे , नुतन कासलीवाल , किरण देवरे , शिवसेना शहर प्रमुख सुनिल जाधव , राजाभाऊ जगताप , राजाभाऊ देखमुख , बाळकाका कलंत्री , प्रकाश शिंदे , भाऊसाहेब काकळीज , पुंजाराम जाधव , बाळासाहेब कवडे , भैय्यासाहेब पगार , भाऊसाहेब सदगीर , विक्रम फोडसे , श्रावण बोगीर , बाजीराव बेंडके , कैलास चोळके , दत्तू काळे , निवृत्ती सदगीर , प्रभाकर कवडे , सुधिर देशमुख , बाळासाहेब पवार ,माणिक आहेर , राजेंद्र हिरे, कारभारी जोरवर , नंदू खरात , दिलीप जोरवर , निळकंठ सानप , संजय बिन्नर , संतोष सदगीर , आण्णासाहेब फोडसे , विश्वास कवडे , शब्बीर शेख , सचिव अमोल खैरनार यांचेसह तालुक्यातील ग्रामस्थ ,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment