पारंपारिक संस्कृतीचा आदर करणारा आमदार लाभलाय नांदगाव मतदार संघाला. !
सा.शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
पुरातन काळापासून हिंदू धर्माच्या चालत आलेल्या प्रथा, परंपरा आता लोप पावत चालल्या आहेत. मात्र या महाराष्ट्रात असे काही हिंदू धर्मीय लोकप्रतिनिधी आहेत कि जे ह्या प्रथा, परंपरेची जोपासना करत आहेत. त्यात नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
नुकतीच नांदगाव शहरातील एकविरा माता ची सात दिवसीय यात्रा संपन्न झाली. त्यात कांदे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने तन मन धनाने सहभाग नोंदवला.
मंगळवारी सायंकाळी किन्नर समाजाचे महामंडलेश्वर पायल नंदगिरी जी तसेच शेकडो किन्नर व देवीच्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घेतला.आमदार सुहास कांदे व सौ अंजुमकांदे यांनी यावेळी देवीची मनोभावी आरती करत जागरणाच्या कार्यक्रमात पूर्णवेळ उपस्थिती नोंदवली.
सनातन हिंदू धर्माची परंपरा जपणे तसेच किन्नर समाजाला सतत मानपान देण्याचे कार्य आण्णा व ताई करत असतात जे कोणालाही आजपर्यंत जमले नाही असे मनोगत पायल नंदगिरी यांनी यावेळी व्यक्त केले.
Comments
Post a Comment