श्री. क्षेत्र नस्तनपूर येथे एकदिवसीय अखंड हरिनाम पारायण सोहळा.!

सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक )  संतोष कांदे 
श्री. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व त्यांच्याच स्वहस्ते स्थापित श्री. शनैश्वर महाराजांच्या तीर्थक्षेत्री संस्थान च्या वतीने व दानशूरांच्या सहकार्याने एक दिवशीय अखंड हरीनाम पारायण सोहळ्याचे आयोजन येत्या १८ तारखेला करण्यात आल्याची माहिती संस्थान चे अध्यक्ष तथा माजी आमदार अँड.अनिल आहेर यांनी दिली.
      या सोहळ्याचे हे शतक महोत्सवी वर्ष असून, सलग शंभर वर्षांपासून हा सोहळा येथे साजरा केला जातो हे विशेष.! सन १९२६ पासून येथे या सोहळ्याचे आयोजन कै. वेडूजी पाटील (न्यायडोंगरी ), कै. रामचंद्र पवार, कै. बाळा गायकवाड (परधाडी ), कै. त्र्यंबक सुर्वे (चांदोरा ), कै. राऊत बाबा (जळगाव खुर्द ), कै. लालमन गरुड (पिंपरखेड ), कै. शामराव वेळसकर, कै. त्र्यंबकराव वाघ (पिंप्री हवेली ), यांनी सुरु केले होते. ते त्यांच्या पश्चात ही अखंडपणे सुरु ठेवण्याचे काम विद्यमान विश्वस्त मंडळ करत आहेत. ही विशेष बाब होय.
         सन १९९० साली संस्थान चे प्रमुख अँड. गोविंद जोशी यांनी या संस्थान चा कारभार माजी आमदार अँड. अनिल आहेर यांच्याकडे सोपवला त्यानंतर संस्थान ने अधिकाधिक लोकांभिमुख होत संस्थान ला विकासकामांच्या माध्यमातून यशोशिखरावर नेले आहे. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अँड. आहेरांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार पंकज भुजबळ व सध्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत करोडो रुपयांची विकासकामे येथे राबवली आहेत. आणि अजूनही त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
      या धार्मिक क्षेत्राला ब वर्गाचा दर्जा मिळाला असून, देणग्या ही करमुक्त करण्यात आल्या आहेत.प्रचंड असे निसर्गरम्य वातावरण, शांतता यामुळे हा देवस्थान परिसर विलोभनीय झाला आहे. यासाठी संस्थान चे अध्यक्ष माजी आमदार अँड. अनिल आहेर, उपाध्यक्ष उदय पवार, जनरल सेक्रेटरी खासेराव सुर्वे, विजय चोपडा,डॉ. शरद आहेर, नारायण अग्रवाल, शिवराम कांदळकर, कैलास गायकवाड, भागवत वाबळे, वाल्मिक सुरासे, उदय पाटील यांचे सततचे प्रयत्न मंदिर विकासासाठी सुरु आहेत.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक