जीवनात आई-वडील व गुरुजनांना कधीच विसरू नका-मुख्याधिकारी डॉ.सौ.देवचक्के
नांदगाव-संतोष कांदे
आपल्या जीवनाला आकार आणि आधार देणाऱ्या आई-वडील व गुरुजनांना कधीच विसरू नका,असे प्रतिपादन नांदगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ.सौ.श्रिया देवचक्के यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पी.बी.पावशे,माजी नगराध्यक्षा सौ.शोभाताई कासलीवाल,आरोग्य अधिकारी बाबासाहेब घुगे,संस्थेचे चेयरमन सुनील कासलीवाल, सचिव विजय चोपडा,सहचिटनिस प्रमिलाताई कासलीवाल उपस्थित होते.
शहरातील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये आयोजित क्रीडा महोत्सवाचे उदघाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून सौ.देवचक्के बोलत होत्या.त्यांनी यावेळी बहुमोल मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.तर संस्थेचे चेयरमन सुनील कासलीवाल यांनी ही आपल्या मनोगतातून खेळाचे जीवनात असलेले महत्व विशद केले.तर गटशिक्षणाधिकारी पावशे यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये खेळाडू उमेदवारांना असलेले महत्व अधोरेखित केले.यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सेंद्रीय खत प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जुगलकिशोर अग्रवाल,रिकबचंद कासलीवाल,सुशील कासलीवाल,सुनिता चोपडा,प्रशासक श्री.गुप्ता,मुख्याध्यापक श्री.खरोटे,प्राचार्या सौ.रेणू पिल्ले,सर्व श्री.सावंत,डफाळ,क्रीडा शिक्षक त्रिभुवन,बागुल,आदीनी कष्ट घेतले.सूत्रसंचालन श्रीमती पठाण यांनी केले तर कु.प्रियंका शिंदे हिने आभार मानले.
Comments
Post a Comment