क्रां.वसंतराव नाईक यांनी दिलेला शब्द फिरवला असता तर..
नांदगाव-: संतोष कांदे
क्रांतिवीर वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांना दिलेला शब्द फिरवला असता,तर आजचा इतिहास वेगळाच असता.!असे प्रतिपादन युवा सामाजिक कार्यकर्ते नवनाथ कांदे यांनी केले.
ते क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जळगाव बुद्रुक येथील हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.कांदे पुढे म्हणाले की,महाराष्ट्राच्या प्रथम मुख्यमंत्री निवड प्रसंगी नांदगाव तालुक्याचे प्रथम आमदार कै. भाऊसाहेब हिरे व कै. यशवंतराव चव्हाण यांच्यात खरी चुरस निर्माण झाली हाती,मात्र क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्याकडून प्रथम शब्द कै. चव्हाण यांनी घेतला असल्याने वसंतराव दिलेल्या शब्दावर ठाम राहिले,अन कै. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले.असे ते शेवटी म्हणाले.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक जयवंत भाबड,प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम आप्पा गीते,नांदगाव तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष कांदे,संजय गीते, गणपत आव्हाड, दत्तात्रय गिते, ज्ञानेश्वर बुरकुल, चंद्रकांत घुगे, शिरोडे सर, चौधरी सर, कऱ्हे सर, प्रदीप फुलमाळी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment