जनसुविधेअंतर्गत तालुक्यात १ कोटी ८७ लाख रुपयांची कामे मंजूर.!
नांदगाव-: संतोष कांदे
नांदगांव मतदार संघात जनसुविधा योजने अंतर्गत १ कोटी ८७ लाखांची विकास कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. आमदार पंकज भुजबळ यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे नांदगांव मतदार संघातील नांदगांव व मालेगांव तालुक्यातील गावांमध्ये जनसुविधा योजने अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमि अनुषंगिक कामे मंजूर झालेली आहेत.
तालुक्यातील माणिकपुंज येथे कब्रस्थान संरक्षक भिंत व जळगांव खुर्द, बोलठान, साकोरा, वेहेळगाव, बिरोळे, हिंगणेदेहरे, पिंपरखेड, हिंगणवाडी, धनेर, नागापूर, भौरी, सावरगांव, तळवाडे, जामदरी, गंगाधरी या गावांना स्मशानभूमी अनुषंगिक कामे मंजूर करण्यात आली आहेत.
मालेगांव तालुक्यातील साकुरी, मथुरपाडे, नरडाने, पाथर्डे, खलाणे, देवघट, नगांव, मांजरे, जळगांव नि; येसगांव, उंबरदे, शेरूळ, पाडळदे, सायतरपाडे या गावांना स्मशानभूमी अनुषंगिक कामे मंजूर करण्यात आलेली आहेत.
Comments
Post a Comment