पिंपरखेड प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या रुग्णकल्याण समितीची बैठक संपन्न..

नांदगाव-:वार्ताहर

तालुक्यातील पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राची  रुग्णकल्याण समितीची बैठक समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्या अश्विनी अनिल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
            बैठकीत पिंपरखेड आरोग्य केंद्रातील सुविधा व असुविधा याबाबत आढावा घेण्यात आला.
सर्व रुग्णांसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अमलबजावणी  करून सर्व सामान्य रुग्णाला योजनांचा लाभ देण्याबाबत प्रयत्न करण्यात यावा.आरोग्य केंद्र परिसरात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.त्याचप्रमाणे परिचारिका, अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स यांच्या कामाचा आढावा घेऊन वैद्यकीय योजना सर्व सामान्य रुग्णापर्यंत पोहचविणे बाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
         सदर बैठकीस पंचायत समिती च्या उपसभापती आशा किशोर आहेर,सरपंच शिवाजी उत्तम सोनवणे गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ए. सी.ससाणे, तालुका पर्यवेशक सी. के.तुपे, वैद्यकीय अधिकारी डॉ.डी. बी.खालकर रुग्णकल्यान समितीचे सदस्य डॉ. प्रभाकर पवार,प्रतापदादा गरुड, वाल्मिक बागुल,संदीप मवाळ, हरेश्वर सुर्वे, धनंजय काळे,बापू सरोदे,व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक