आठवडे बाजार ही संकल्पना शेतकऱ्यांच्या घामाला खरे दाम देणारी-माजी आमदार अँड.आहेर

    नांदगाव-संतोष कांदे
सद्यस्थितीत तालुकाभरात अनेक मोठ्या गावांमध्ये आठवडे बाजार भरतोय.ही गोष्ट स्थानिक शेतकरी वर्गासाठी लाभप्रद अशीच आहे.आडत,हमाली,व वाहतूक खर्च वाचणार असल्याने शेतकऱ्यांच्या कष्टाचे खरे मोल मिळेल असे प्रतिपादन माजी आमदार अँड.अनिल आहेर यांनी केले
        तालुक्यातील परधाडी येथे आठवडे बाजाराचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता,बाजार समितीचे माजी उपसभापती उदय पवार,श्री.शनी संस्थान चे विश्वस्त खासेराव सुर्वे,शिवाजी बच्छाव,आदी उपस्थित होते.
     पुढे बोलताना आहेर म्हणाले की,शेतकऱ्यांचा भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत विक्री होऊ लागल्याने त्यांचा जसा खर्च वाचून फायदा होणार आहे,अगदी त्याच प्रमाणे ग्राहकांचा ही यात फायदाच होणार आहे.कुठलाही खर्च नसल्याने त्यांना ही अगदी अल्प दरात हा भाजीपाला उपलब्ध होऊ लागला आहे.यावेळी राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी ही मनोगतात म या आठवडे बाजाराच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या गोष्टी कशा घडतील याचे सुंदर विवेचन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास गायकवाड यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक