आधुनिकतेचा स्पर्श झालेल्या देवस्थानात पारंपरिक धार्मिक सोहळ्याचे ही महत्व अबाधित-अँड.आहेर

नांदगाव-: संतोष कांदे
गेल्या ४६ वर्षांपूर्वी कै. हभप रंगनाथ स्वामी महाराज,कै. शंकर नाना महाराज,कै.अण्णासाहेब आहेर,कै. विजयमामा आहेर या विभूतींनी श्री क्षेत्र नस्तनपूर या क्षेत्रावर ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली होती.आणि आज या ठिकाणी आमूलाग्र बदल घडून आला आहे,म्हणजेच या क्षेत्राला ही आधुनिकतेचा स्पर्श झाला आहे,तरीही पूर्वजांनी ज्या काही चांगल्या प्रथा येथे पाडल्या आहेत,त्याचे पालन यापुढच्या काळात ही केले जाईल.असे प्रतिपादन माजी आमदार तथा श्री.शनी संस्थानचे जनरल सेक्रेटरी अँड.अनिल आहेर यांनी केले.
      अर्धशतकाकडे वाटचाल होत असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या सांगता प्रसंगी या ठिकाणी किर्तनरुपी सेवा बजावलेल्या किर्तनकारांचा सन्मान करण्यात आला,त्यावेळी अँड.आहेर बोलत होते,ते पुढे बोलताना म्हणाले की, सन १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीत सर्वांचाच दैववादावरचा विश्वास दृढ झाला होता,किंबहुना तशी परिस्थिती दुष्काळाने निर्माण झाली होती,म्हणून कुठेतरी आशेचा किरण निर्माण करून लोकांमध्ये दुष्काळाशी लढण्यासाठी अंतर्गत दैवशक्तीचे बळ तयार होण्यासाठी वरील चार ही विभूतींनी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची संकल्पना मांडून ती अंमलात ही आणली.
       आज अत्यंत मोठ्या स्वरूपात साजरा होणाऱ्या या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांच्या लाभणाऱ्या प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करून,आणि या सोहळ्यात महाराष्ट्रातील नामांकीत,सुप्रसिद्ध किर्तनकारांचा सहभाग यामुळे दरवर्षी हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण करण्याचा प्रयत्न संस्थान व ज्ञानेश्वरी पारायण समितीने केला आहे,असे अँड.आहेर शेवटी म्हणाले.
       ह.भ.प कृष्णा महाराज राऊत बीड यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने पारायनाचा सांगता  सोहळा सोहळा पार पडला या वेळी मंदिर परिसरात सुंदर अश्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या वेळी हजारोच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला  यावेळी  संस्थांचे विश्वस्त खासेराव सुर्वे,उदयआप्पा पवार, भिकन मवाळ,कैलास गायकवाड,निबां सरोदे,डॉ.अरूण पवार,वामन चौधरी,शिवाजी बच्छाव,भास्कर शेवाळे,नाना पवार,सुनिल पवार आदी उपस्थित  होते.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक