माणिकपुंज धरणाचे पाणी तालुक्याच्या हक्काचेच-संतोष गुप्ता

सा.शनैश्वर टाइम्स इफेक्ट

                  नांदगाव-: संतोष कांदे

सा.शनैश्वर टाइम्स मध्ये काल प्रसिद्ध झालेल्या बतमीनंतर मोठी खळबळ उडाली,व माणिकपुंज धरणाचे पाणी तालुक्यातच रोखून धरण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस ने सर्वप्रथम सहभाग नोंदवत तहसीलदार श्रीमती भारती सागरे यांना निवेदन देत 'हे पाणी तालुक्याबाहेर जाण्यास प्रखर विरोध नोंदवला.
        तालुक्यातील माणिकपुंज धरणाचे पाणी शेती सिंचनासाठी व पिण्यासाठी नांदगांव तालुक्यालाच पुरत नसताना जळगांव जिल्ह्यातील चाळीसगांव तालुक्यात कालव्याद्वारे जाणार असल्यामुळे सतत दुष्काळी असलेल्या नांदगांव तालुक्यावर अन्याय होत असल्याची भावना तालुकावासियात मूळ धरू लागली आहे. तालुक्यात अनेक धरणे असूनही या धरणांचे पाणी तालुक्यातील जनतेला मिळत नाही.तालुका दुष्काळी असतांनाही जळगांव जिल्ह्यातील हेविवेट नेत्यांनी अन्याय केला असून याचाच भाग म्हणजे माणिकपुंज धरणाचे पाणी चाळीसगांव तालुक्याला नेण्याचा प्रयत्न दबाव तंत्राने व षड्यंत्राने सुरु आहे.
       माणिकपुंज धरण निर्मितीच्या वेळेस वॉटर अकाउंट च्या नावाखाली म्हणजेच जळगांव जिल्ह्याला वाहून जाणारे पाणी कमी होईल म्हणून या धरणाला मोठ्याप्रमाणात विरोध करण्यात आला. व मोठे होणारे धरण लहान झाले.त्यामुळे नांदगांव तालुक्याचा शेती सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून केलेली धरणाची निर्मिती ही तालुक्याचा शेती सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकलेली नाही. या धरणासाठी नांदगांव तालुक्यातील अनेक शेतक-यांच्या शेत जमिनी गेल्या आहेत. धरणात पाणी कमी असल्याचे कारण दाखवून नांदगांव तालुक्यातील लिफ्ट पाईप लाईन पाणी उपसा योजना बंद करण्यात आलेल्या आहे.     माणिकपुंज धरणावरून नांदगांव शहर व ग्रामीण भागाच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आहे तसेच मन्याड नदी किनारी असणा-या नांदगांव तालुक्यातील सावरगांव व इतर गावांना सिंचनासाठी व पिण्यासाठी नदीला पाणी सोडले जाते.
              पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांना आपल्या हक्काच्या पाण्यासाठी ब-याच वेळेस आंदोलन करावे लागते. त्यामुळे या धरणाचे पाणी  तालुक्यालाच पुरत नसल्यामुळे व या पाण्यावर फक्त आणि फक्त तालुक्यातील जनतेचा अधिकार असल्यामुळे दुष्काळी तालुक्याचा विचार करण्यात येवून माणिकपुंज धरणाचे पाणी चाळीसगांव तालुक्याला न देता  तालुक्यालाच मिळावे .असे या निवेदनात म्हटले आहे.
      तालुक्याचा नार पार योजनेत समावेश करण्यात यावा. तालुक्यातील गिरणा धरण, मन्याड धरण या धरणावरून पाणी लिफ्ट करून तालुक्यातील काही छोट्या धरणांना देण्यासाठी योजना तयार करण्यात यावी. गिरणा धरणाचा पाणी साठा शाश्वत असल्याने तालुक्यातील ज्या गावांनी पिण्याच्या पाण्याच्या योजनेची मागणी केली आहे त्या गावाच्या योजनांना मान्यता व निधी देण्यात यावा. वरील मागण्या मान्य न  झाल्यास स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी सर्व शेतक-यांना घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदगांव तालुका तर्फे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
        याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दत्तू पवार, गोरखनाथ आहेर, राजेंद्र लाठे, राजेंद्र आहेर, अशोक पाटील, मुकुंद खैरनार, भाऊसाहेब महाजन, महेंद्र गायकवाड, सचिन कोरडे, सोपान गोराडे, विठोबा मवाळ, मनोज कोरडे, पोपट कवडे, धनराज बुरकुल, पांडुरंग गोराडे, रविंद्र गायकवाड, राजाराम घुगे, राहुल भोपळे, नाना पवार, रामदास पवार, प्रताप गरुड, निवृत्ती आव्हाड, गणेश वाघ, संभाजी शिंदे, सलीम शेख, ज्ञानदेव गोराणे, उत्तम वाघ, नाना गिरे,  लहू कडाळे, मधु सावंत, भगवान पाटील, उत्तम बच्छाव, भागवत पगारे, नाना मोरे, प्रविण गायकवाड, वैभव पवार, कचरू मेंगाळ, तुकाराम मेंगाळ, अशोक कोल्हे, रावसाहेब गोराडे, अक्षय पवार, ऋषिकेश पवार, समोर शेख, किरण बागुल, गौतम जगताप, संदिप सुरसे, आकास शेलार, राहुल शेलार आदी उपस्थित होते. तसेच या आंदोलनाला भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष कमलेश पेहरे, मनसे तालुका अध्यक्ष योगेश सोनार, सामाजिक कार्यकर्ते संजय मोकळ आदींनी पाठिंबा दिला.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक