पंकज खताळ मित्र परिवाराने केल्या मोफत ४१७ मोतीबिंदू शस्त्रक्रिया.!
नांदगाव-: संतोष कांदे
मनमाड येथील पंकज खताळ मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने ४१७ मोतीबिंदू रुग्णांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल (पुणे) येथे करण्यात आले.
नांदगाव तालुक्यातील १४ बसचे जल्लोषात स्वागत पंकज खताळ पाटील यांच्या कार्यालयात करण्यात आले. शिबिरांना प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तरी शिबिराचे ७ टप्पे भालूर गण, पानेवाडी गण, सोनज गण, निमगाव गट मध्ये १०० ठिकाणी व मनमाड शहरात २५ ठिकाणी शिबिर यशस्वी रीत्या पुर्ण झाले आहे.
या शिबिरात आतापर्यंत २१३०० पुरुष महिलांची तपासणी झाली असून १४२३ मोतीबिंदू रुग्ण आढळले आहेत. तसेच शिबिराचा ८ वा टप्पा दि १३ डिसेंबर ते दि २१ डिंसेंबर पर्यंत आहे.दि.२ डिसेंबर रोजी पंकज खताळ पाटील मित्र परिवार तर्फे संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये सुरु असलेला मोफत १०३ मोतीबिंदू होऊन आलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया शिबिरातून पंकजभाऊ खताळ पाटील पाटील यांच्या माध्यमातून ऑपरेशन होऊन आलेले पहिल्या तीन बसचे रुग्णांची दुसरी तपासणी प्रसंगी साई हॉस्पिटल, कृष्णा भारत गॅस येथे झाली.
दरम्यान नांदगाव तालुक्यातून पुणे येथे शस्त्रक्रिया साठी जात असलेल्या बसला भाजप तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड यांचे हस्ते श्रीफळ वाढवून,शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, जिल्हा सरचिटणीस पुरुषोत्तम निकम,नांदगाव तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष कांदे,आदींसह रुग्ण उपस्थित होते.
Comments
Post a Comment