भविष्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचे नियोजन आवश्यक-अश्विनी आहेर
नांदगाव-: संतोष कांदे
वाहून जाणाऱ्या पाण्याचे महत्व जाणून न घेतल्यामुळे तालुक्याला यंदा भीषण दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे,त्यामुळे भविष्यात असा प्रसंग उदभवणार नाही यासाठी पुरपाणी अडवून जिरवले जाईल यासाठी गावासाठी जलयुक्त शिवार योजनेतून ३५ कामे मंजूर करण्यात आले आहेत.असे प्रतिपादन न्यायडोंगरी जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या कु.अश्विनी आहेर यांनी केले.
तालुका कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत "कम्पारमेन्ट बांध" या कामाचा शुभारंभ न्यायडोंगरी येथील शेतकरी संजय कोऱ्हाळे यांचे शेतात जिल्हा परिषद सदस्या कु.अश्विनी अनिल आहेर यांचे हस्ते करण्यात आला,त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी नांदगाव पंचायत समितीच्या उपसभापती सौ आशा आहेर,सरपंच संजय आहेर,तालुका कृषी अधिकारी विजय पवार,शेतकरी बांधव, तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना आहेर म्हणाल्या की,शासनाच्या विविध विभागाअंतर्गत या योजनेतून एकट्या न्यायडोंगरी गावासाठी एकूण ३५ कामे मंजूर करण्यात आले असून ते टप्याटप्याने सुरू करण्यात येणार आहेत,त्यात कृषी विभागाच्या वतीने नाला खोलीकरण नऊ ,गाळ काढणे चार, कम्पारमेन्ट बांध दोन,लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद कडून सिमेंट नाला बांध दुरुस्ती ची चार कामे तर स्थानिक स्थर विभागाचे वतीने पाच नवीन सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहे तसेच वन विभागाच्या वतीने तीन,भूजल सर्वेक्षण तर्फे एक, व ग्रामपंचायतीच्या वतीने सात असे एकूण पस्तीस कामे जलयुक्त शिवार अभियानाचे सन २०१८/२०१९ निधीतून ९०.९४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.कार्यक्रमाचे नियोजन कृषी विभागाचे सिद्दीकी,डोखे,शेवाळे मॅडम,नाईक,शिंदे यांनी केले.
Comments
Post a Comment