आई घराचा कळस तर बाप पाया.!- हभप बाळकृष्ण महाराज बुरकुल

कै. देवराम (अप्पा) साठे यांच्या दशक्रिया विधी प्रसंगी..
                    नांदगाव-: संतोष कांदे

पुत्राच्या वियोगानंतर सहाव्या दिवशी प्राण सोडणारे राजा दशरथ,शत्रूच्या कारवायापासून पुत्र व पत्नीला वाचवणारे शहाजी राजे हे उत्कृष्ट 'बाप' होते.अगदी त्याच प्रमाणे आई घराचा कळस असते,तर बाप पाया असतो.असे प्रतिपादन तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकार हभप बाळकृष्ण महाराज बुरकुल यांनी केले.
     जळगाव बुद्रुक येथील माजी सरपंच व काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते साठेअप्पा यांच्या दशक्रिया विधीनिमित्त प्रवचन करताना ते बोलत होते.यावेळी त्यांनी अनेक पौरोणिक, ऐतिहासिक दाखले देत 'बाप' या पृथ्वीतलावरील देवतेचे महत्व उपस्थितांसमोर उलगडून दाखवले.
      यावेळी माजी आमदार अँड.अनिल आहेर,नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते साहेबराव पाटील यांनी ही साठेअप्पा यांच्या 'आहेर'कुटुंबियांशी असलेला ऋणानुबंध  तसेच त्यांच्या राजकीय,कौटुंबिक कार्याला उजाळा दिला.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक