दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने नांदगाव तालुक्याकडे फिरवली पाठ.!

              तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने धावपळ करत केंद्रीय पथकाला मेहुणे येथे गाठत दिले निवेदन.

                     नांदगाव-: संतोष कांदे
दुष्काळी तालुक्यांतील सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने नांदगाव तालुक्याकडे दुर्लक्ष करून मालेगाव तालुक्याची पाहणी करत दौरा आटोपता घेतला,मात्र नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मालेगाव तालुक्यात जावून विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय आयुक्त श्रीमती झा.यांना दिले.
      राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता,नगरसेवक वाल्मिक टिळेकर,नगरसेवक अमजद पठाण,माजी नगरसेवक प्रकाश बोधक,शहर उपाध्यक्ष सतिश अहिरे, आदीं पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाला दिलेल्या निवेदनात,५६ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना २०११ मध्ये कालबाह्य झाली असून,या योजनेद्वारे सुमारे ८० गावांना पाणीपुरवठा होत असल्याच्या कारणाने या योजनेचे पुनर्जीवन अति महत्वाचे होते,म्हणून शासनाने या योजनेचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश करून १०० कोटी रुपयांची तरतूद ही केली आहे,मात्र या योजनेचा सर्व्हे व आराखडा तयार करण्यासाठी ४१.२७ लक्ष रुपयांची आवश्यकता आहे,तो निधी मात्र उपलब्ध करून दिलेला नाही.तो निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा,इतर पाणी पुरवठा योजनांचे वीज बिल टंचाई निधीतून भरण्यात यावे,शेतकऱ्यांना वीज बिल माफ करून माणिकपुंज,कासारी परिसरात छावण्या सुरू करून,चारा उपलब्ध करावा,तसेच तालुक्यातील सर्व खाजगी शाळा,विद्यालयांमधील विद्यार्थ्यांना शालेय व परीक्षा फी माफ करावी.टंचाई ग्रस्त गावांना तत्काळ टँकर सुरू करावेत,स्वस्त धान्य दुकानातून अधिकचे धान्य उपलब्ध करून द्यावे,यासह अनेक मागण्या या तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी या केंद्रीय पथकाकडे केल्या.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक