मनमाड शहरातून जाणाऱ्या जड व मोठ्या वाहनांसाठी बायपास दयावा-मयूर बोरसे
अधीक्षक अभियंत्यांना दुसऱ्या स्मरणपत्राद्वारे केली विनंती.
नांदगाव-: संतोष कांदे
शहरातून जाणाऱ्या दोन राज्यमार्गामुळे अपघात ही नित्याची बाब झाली असून,जड व मोठ्या वाहनांना शहराबाहेरून बायपास करावा अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी केली आहे.
अधीक्षक अभियंत्यांना पाठवलेल्या दुसऱ्या स्मरणपत्रात शहरप्रमुख बोरसे यांनी पुढे म्हटले आहे की,या शहरातून दोन राज्यमार्ग जातात,तर एका राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर ही झाले आहे.मात्र याच मार्गावर शाळा,महाविद्यालये,रेल्वे स्टेशन,दवाखाने आहेत.त्यामुळे या मार्गावर अपघात मालिका सतत सुरू असते,तसेच वारंवार ट्रॅफिक जॅम चा प्रश्न भेडसावतो.
या मार्गावरून जाणाऱ्या जड व मोठ्या वाहनांसाठी लवकरात-लवकर बायपास करण्यात यावा अशी मागणी शेवटी करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे,कार्यकारी अभियंता महाराष्ट्र्र राज्य रस्ते विकास महामंडळ,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पाठवण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment