न्यायडोंगरी आश्रमशाळेत गोवर,रुबेला लसीकरण मोहीम संपन्न.!

नांदगाव-: वार्ताहर


  तालुक्यातील न्यायडोंगरी येथील स्वर्गीय गंगाधर(आण्णासाहेब) शिवराम आहेर आदिवासी अनुदानित आश्रमशाळेत गोवर,रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
      काल (दि.१९) रोजी येथील आदिवासी अनुदानित प्राथमिक व  माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात डॉ. विष्णु प्रतापराव आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत गोवर रुबेला लसीकरण मोहीमेचा शुभारंभ पार पडला.याप्रसंगी पत्रकार जगन प्रतापराव आहेर ,शशिकांत पाटील,लक्ष्मण पाटील,सुनिल आहेर,श्रीमती सारिका आहेर,भैया पाटील,भास्कर सोळसे उपस्थित होते.
        महाराष्ट्र शासन आरोग्य अभियान योजनेत  गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे महत्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष जगताप यांनी सांगितले.व पालकांच्या शंकांना उत्तरे देऊन निरसन ही केले.या मोहीमेत शाळेतील  इ.१ली ते १०वी च्या विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली.
      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन श्री.बी.के.रायते यांनी तर आभारप्रदर्शन पी.जी.राठोड यांनी केले.


Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक