गोवर व रुबेला लसीकरण भालूर येथे उत्साहात.!
नांदगाव-: संतोष कांदे
तालुक्यातील भालूर येथे गोवर व रुबेला लसीकरणाचा प्रारंभ सरपंच संदीप आहेर व पंचायत समिती सदस्य श्रावण गोरे यांचे हस्ते करण्यात आला.
प्रथम जनता विद्यालयातील लसीकरण सरपंच आहेर यांच्या उपस्थितीत तर प्राथमिक शाळेचा प्रारंभ श्रावण गोरे यांचे हस्ते करण्यात आला.वैद्यकीय अधिकारी श्री.जगताप, श्री.कराड यांच्या नेतृत्वाखाली १२०० विद्यार्थ्यांना मोफत लसीकरण करण्यात आले.यावेळी माजी सरपंच विठ्ठल आहेर,कचरू आहेर,दिगंबर निकम,बाबासाहेब आहेर,विलास आहेर,राजेंद्र लहिरे,चांगदेव उगले,राजेंद्र तळेकर,प्रदीप आहेर,सुभाष निकम,वाल्याबाई आरसुलळे,मुख्याध्यापक बाविस्कर,ठोंबरे ,आरोग्य सेविका श्रीमती अहिरे यांच्यासह ग्रामस्थ, पालक,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
जनता विद्यालय,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निकम वस्ती शाळा, शिंदे वस्तीशाळा,बागुल वस्तीशाळा,अंगणवाडी केंद्रात लसीकरण करण्यात आले सकाळच्या सत्रात छोटया बालकांना कड्यावर घेऊन पालकांच्या रांगा लागल्या होत्या.
Comments
Post a Comment