अखेर अंगणवाडी सेविकांनी निकामी मोबाईल जमा केले....
नांदगाव-: संतोष कांदे
ग्रामीण भागातील महिला,बालकांच्या आरोग्य व पोषणाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मोठा गाजावाजा करत ऑनलाइन कामासाठी जे मोबाईल देण्यात आले होते,ते काही महिन्यातच कुचकामी ठरल्याने आज अखेर हे मोबाईल कार्यालयात जमा करण्यात आले.
तत्कालीन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडीचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्याच्या दृष्टीने अंगणवाडी सेविकांना एका कंपनीचे मोबाईल पुरवले होते,व त्यासाठी दरमहा रिचार्जची रक्कम ही खात्यावर पाठवली जात होती.मात्र सदर मोबाईल हे निकृष्ट दर्जाचे असल्याने वारंवार खराब होत होते.आणि दुरुस्तीचा खर्च संबधित अंगणवाडी सेविकेला करावा लागत असल्याने अगोदरच तुटपुंजे मानधन असलेल्या अंगणवाडी सेविकांवर 'भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची वेळ या मोफत च्या मोबाईल मुळे आली होती.व दुरुस्तीचा खर्च करून वैतागलेल्या अंगणवाडी सेविकांनी आज अखेर हे मोबाईल प्रकल्पधिकारी सागर वाघ यांच्याकडे जमा केले आहेत.आता यावर संबधित महिला व बालकल्याण विभाग काय कारवाई करतो याकडे लक्ष लागले आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष मनोरमा लोंढे,बिट अध्यक्ष मीराबाई राठोड,श्रीमती शेख,श्रीमती विसपुते,आदींसह शेकडो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment