आमदार कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप.

नांदगाव-: संतोष कांदे
तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करून स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था व स्व.सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुउद्देशीय संस्थेने सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले.
   यावेळी अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन थेरे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष,संपादक संतोष कांदे,पत्रकार अनिल आव्हाड,सुरेश नारायणे, या संस्थेचे संस्थापक अनिल धामणे,कामगार सेनेचे अध्यक्ष वामन पोतदार,प्रतिष्ठित व्यापारी नंदलाल वर्मा,श्यामभाऊ पारख,मेजर दिनकर आहेर,आदी उपस्थित होते.
     यावेळी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.पत्रकार सुरेश नारायणे यांनी आमदार सुहास कांदे यांचा वाढदिवस या पद्धतीने साजरा करण्याविषयीचा सदर संस्थेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की,आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तालुक्यात अनेक विकासाची कामे केलीत,व करत आहेत. शहर विकासाबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचाही ते विचार करतांना दिसुन आले आहे.त्यांनी कोरोनाच्या या महामारीत आरोग्य विषयक अनेक विधायक उपक्रम हाती घेऊन तालुक्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे त्यांच्या सुचनेनुसार येथील ग्रामीण रुग्णालयाने अनेक कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करुन आजारातुन बरे केले.असे रुग्णांची काळजी घेणारे आमदार या तालुक्याला लाभले हे आपल्या सामान्य जनतेचे भाग्यच आहे.असे ते शेवटी म्हणाले.
    यावेळी ग्रामीण रुग्णालयातील अजय भदाणे, सुनिल कुलकर्णी, कमलाकर राठोड, श्रावण सातपुते, राम शिंदे आदी उपस्थित होते.सुरेश देव यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक