जळगाव बुद्रुक सोसायटीच्या चेयरमन व्हा.चेयरमन ची बिनविरोध निवड..

सा.शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव -: संतोष कांदे
तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्षपदी पांडुरंग तुरकूने यांची तर उपाध्यक्ष पदी भाऊसाहेब पोपट गिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
      ठरलेल्या आवर्तनानुसार संतोष आव्हाड यांनी राजीनामा दिल्यानंतर श्री.तुरकूने व श्री.गिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी आमदार सुहास कांदे यांच्यातर्फे युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे,व प्रकाश शिंदे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार केला.
      यावेळी संचालक धनराज बुरकुल , पंढरीनाथ कांदे, लताबाई बोडखे , लक्ष्मीबाई कांदे , रघुनाथ गावंडे, बाळू कांदे ,संतोष आव्हाड , भागा बुरकुल , सतीश गीते, विठ्ठल अहिरे  आदी सह बाबासाहेब साठे, विजय आव्हाड, दत्तात्रय कादे गंगा कांदे,संजय बोडखे, दिलीप घुगे, भिवा सोनवणे,  सुपडू बागुल , गजानन घुगे , वाळू गीते,  किसन मेंगाळ, आदी उपस्थित होते.अध्यक्ष तुरकूने व उपाध्यक्ष गिते यांचे तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक