जनतेच्या छोट्या -छोट्या समस्या सोडवणारा आमदार खऱ्या अर्थाने कुटूंबप्रमुख -: सौ.अंजुम सुहास कांदे
सा.शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक) -: संतोष कांदे
तुमच्या छोट्या - छोट्या गोष्टी लक्षात ठेवून त्या सोडवण्याला प्रथम प्राधान्य देणारा आमदार या तालुक्याला प्रथमच लाभलाय.आजपर्यंत जातीचा दाखला घरपोह्च देणारा आमदार तुम्ही बघितला का.? असा सवाल करत सौ.अंजुम कांदे यांनी आमदार सुहास अण्णांच्या कामाची महती नांदगाव विधानसभा मतदार संघातील सोनज गटातील शिरसोंडी ग्रामस्थ व महिलांसमोर सांगितली.
बचत गट भवन व, गावांतर्गत सिमेंटचे रस्ते कामाचे भूमिपूजन व ठक्कर बापा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत समाजिक सभागृहाचे उदघाट्न,वीर एकलव्य पुतळ्याचे अनावरण आमदार सुहास कांदे यांच्या सौ.अंजुम कांदे व पुतणे धनंजय कांदे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी महिलांचा हळदी - कुंकू कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर सरपंच सौ.सोनाली पवार,भाऊसाहेब पवार,महेंद्र नाना दुकळे,सौ.उज्वला ताई खाडे, सौ.विद्याताई जगताप,सौ.रोहिणीताई मोरे,पुजाताई छाजेड, मनीषाताई इंगळे,आदिंसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ.कांदे म्हणाल्या की,मोठमोठी विकासकामे या गावात झाली आहेतच ; मात्र तुमच्या आरोग्य,शिधापत्रिका, जातीचे दाखले,डोळ्यांचे चष्मे ,अशा छोट्या गोष्टीकडे ही जाणीवपूर्वक लक्ष आपल्या सुहास अण्णांनी दिले आहे.आणि जसे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो.तसेच प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पतीचा हात असतो.ही गोष्ट ही प्रत्येकीने लक्षात ठेवावी.या गावातील प्रत्येक महिला हिरा आहेत,आणि या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम मी व अण्णा एका उद्योगाच्या माध्यमातून करणार आहोत.असे त्या शेवटी म्हणाल्या.
धनंजय कांदे म्हणाले की,या गावात रस्ते,पूल,सामाजिक सभागृह,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याकरिता आमदार सुहास अण्णांनी १५ कोटीपेक्षा जास्त निधी दिला असून,काही कामे पूर्ण तर काही कामे सुरु आहेत.असे सांगितले.
या कार्यक्रमास भावराव बागुल,रवींद्र बोरसे,प्रवीण देवरे,समाधान के बोरसे,समाधान बोरसे,राजू चव्हाण,बाळू वाकचौरे,दत्तू सोनावणे,दत्तू वाकचौरे,शरद चव्हाण,रवींद्र चव्हाण,सुभाष पवार,पुंजाराम पवार, आदिंसह हजारो महिला ,ग्रामस्थ,शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक,महिला आघाडी च्या पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment