होलार समाजाला आ.कांदे यांच्याकडून सभामंडप व व्यायामशाळा मंजूर.!
सा.शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक) -: संतोष कांदे
शहरातील भोंगळे रस्त्यालगत आमदार सुहास कांदे यांच्या निधीतून होलार समाजासाठी व्यायामशाळा व सभामंडप मंजूर करण्यात आला असून,या कामाचे भूमिपूजन आ.कांदे यांच्या पत्नी सौ.अंजुम कांदे यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक अमोल नावंदर,माजी नगरसेवक नंदू पाटील,शहर अध्यक्ष सुनील जाधव,सौ.रोहिणी मोरे,रामनिवास करवा, विजय चोपडा,भगवान सोनावणे,रवी सोनावणे,रोहिदास सोनावणे,नामदेव सोनावणे,पंडित गेजगे,संजय गेजगे,शिरूभाऊ शेलार,पप्पू सोनावणे,पप्पू जाधव,नितीन सोनावणे,बापू जाधव,सागर सोनावणे,सर्वेश्वर हातेकर, बिरू जाधव,जय जाधव,आदिंसह मोठ्या प्रमाणात नागरिक,समाज बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment