अपादग्रस्त कुटूंबाला आ.सुहास कांदेंकडून त्तकाळ संसारपयोगी साहित्य.!

सा.शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक) -: संतोष कांदे
शहरालगत असलेल्या गिरणानगर येथील माणिक मोरे या आदिवासी तरुणाच्या झापाला आग लागून संसारपयोगी वस्तू त्यात धान्य, सर्व भांडी,कपडे आदी महत्वाच्या गोष्टी जळून खाक झाल्याने त्याचा संसार मोडून पडला.ही गोष्ट गिरणानगर च्या सरपंच सौ.अनिता पवार यांनी तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या सुविद्य पत्नी सौ.अंजुम कांदे यांना कळवली.
    सौ.कांदे यांनी लगोलग या कुटूंबाला त्यांच्या निवास्थानी  (देवाज ) बंगल्यावर बोलावून घेतले.व या कुटूंबाची आस्थेवाईक पणे चौकशी करून त्यांना एक क्विंटल धान्य,रोजच्या वापरासाठी लागणारी आवश्यक ती स्टील ची भांडी,कपडे,देवून त्या कुटूंबाला आम्ही तुमच्या सोबत असल्याचा दिलासा दिला.या मदतीबाबत या मोरे कुटूंबाने आ.सुहास कांदे व सौ.अंजुम कांदे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
      यावेळी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख उज्वला ताई खाडे, युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे,शशी सोनावणे,सुनील जाधव,राहुल पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक