जे ५० वर्षात झाले नाही ; ते ३ वर्षात करून दाखवले.! सौ.अंजुम सुहास कांदे

नांदगाव -: संतोष कांदे
आज महाशिवरात्री,जागतिक महिला दिन,आणि वीर एकलव्य महाराज यांची जयंती असा सुवर्णं योग जुळून आला आहे.आणि त्या निमित्ताने आज तुमच्याशी हितगुज करण्याची संधी मिळाली.हे आमचे भाग्य आहे.यापूर्वी जसे प्रेम ,आशीर्वाद देऊन तुम्ही अण्णाला निवडून दिले.तशीच साथ यापुढे कायम असू द्या.असे आवाहन आमदार पत्नी सौ.अंजुम सुहास कांदे यांनी मतदारसंघातल्या विविध गावात साजऱ्या झालेल्या एकलव्य जयंती निमित्त केले.
     आज सोयगाव,हिसवळ खुर्द,चोंढी जळगाव, सावकारवाडी,वऱ्हाणे, येथे वीर एकलव्य महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी बोलताना सौ.कांदे यांनी आमदार सुहास कांदे यांनी मतदार संघात केलेल्या कामांचा उल्लेख आपल्या भाषणातून केला.त्यात करंजवन पाणी योजना,७८ खेडी पाणी योजना,मनमाड औद्योगिक वसाहत,नांदगाव स्वतंत्र पाणी पुरवठा योजना,आणि भविष्यात महिलांसाठी घरपोह्च उद्योग आणि शेती सिंचनासाठी शाश्वत पाणीपुरवठा,यासह नागरिकांना सध्या ज्या आरोग्य,शिधापत्रिका, शासकीय कागदपत्रे,अशा मूलभूत गरजा पूर्ण केल्याच ; परंतु जे गेल्या ५० वर्षात झाले नाही.ते तीन वर्षात आमदार सुहास अण्णांनी करून दाखवले असल्याचे त्यांनी नमूद केले.
      यावेळी शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.विद्या जगताप,सौ.संगीता बागुल,रोहिणी मोरे,सौ.मायाताई खाडे, धनंजय कांदे,मनमाड बाजार समितीचे माजी सभापती अंकुश कातकडे, नागापूर चे सरपंच राजेंद्र पवार,शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष महेंद्रनाना दुकले,उपसरंपच संजय आहेर,कैलास फुलमाळी,सरपंच समाधान व्हडगळ,संतोष सोनावणे,पोपट आहेर,संदीप आहेर,विजय आहेर,गंगाराम पवार,सुमन खुरसने,नंदा सोनावणे,रेखा वाघ,आशाबाई आहिरे,सरपंच भरत पवार,आदिंसह शेकडो ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक