आ.सुहास कांदे च्या प्रयत्नातून कळवाडी गटातल्या महादेव मंदिरासाठी सुमारे तीन कोटी २० लाख रुपये कामाचे भूमिपूजन..

सा.शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक) -: संतोष कांदे
आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील कळवाडी गटातील देवघट येथील वैजनाथ मंदिर परिसर सुशोभीकरण साठी राज्य सरोवर अंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी तसेच तीर्थ क्षेत्र विकास निधी अंतर्गत वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.त्या कामांचे भूमिपूजन ज्ञानेश्वर कांदे यांचे हस्ते करण्यात आले.
      त्याचबरोबर याचं गटातील सुप्रसिद्ध अशा चिपदरा महादेव मंदिरापर्यंत रस्त्याची सुधारणा व मंदिर कमान यासाठी ही सुमारे एक कोटी रुपयांचा निधी आ.सुहास कांदे यांनी मंजूर करून आणला.त्याचे ही भूमिपूजन यावेळी ज्ञानेश्वर कांदे यांचे हस्ते करण्यात आले.तसेच यावेळी उज्जैन येथून सिद्ध करून आणलेल्या रुद्राक्ष चे महिला वर्गाला वाटप ही महाशिवरात्री च्या पार्श्वभूमीवर श्री.कांदे यांचे हस्ते करण्यात आले.
    सदर तिन्ही कामे मंदिर परिसरासाठी मंजूर करून आणल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी दिनकर महाले,साहेबराव नरवडे,मांगू तात्या चव्हाण,विनोद शेठ सोनजे,संजय उगले,नाना पगार,राजूभाऊ आहिरे,रोहित जाधव,प्रदीप देसले सर,भल्ला डॉक्टर,अभिमन डांबरे,सोनू पाटील,संदीप भामरे,प्रशांत देसले,राजेंद्र शिंदे,चंद्रशेखर शेलार,गोकुळ भवर,विजय वाघ,सूर्यवंशी सर,गोकुळ सांगळे, यशवंत अप्पा देसले,हेमंत चैतराम,राकेश आहिरे,शिवाजी देसले,योगेश देसले,विकास आहिरे,काशिनाथ कदम,साहेबराव महाले,नामदेव शिंदे,संदीप आहिरे,किसन गांगुर्डे,प्रवीण गांगुर्डे,संजय गांगुर्डे,ज्ञानेश्वर काकळीज,संदीप देसले,भिकाजी आहिरे,मधुकर भामरे,खगेश जाधव,अनिल सोनावणे,वीरेंद्र जाधव,कन्हैया कुटे,रामदास केदार,बाळू भिला निकम,भिकन निकम,अशोक उगले,कैलास उगले,संजय धात्रक,गोरख पगार,शिवसेनेचे पदाधिकारी,शिवसैनिक, आदिंसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक