स्त्री स्वातंत्र्य पेक्षाही कुटूंबाचे सुख महत्वाचे... -: सौ.अंजुम सुहास कांदे

सा.शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव -: संतोष कांदे
 विवाहित स्त्री ने मॉडर्न होऊन पतीच्या पुढे जाण्यापेक्षा पतीच्या खांद्याला खांदा लावून कुटूंबाच्या सुखासाठी,प्रगतीसाठी साथ दिली पाहिजे.आणि त्यासाठी आपले आमदार सुहास अण्णा व मी तुम्हाला मदत करणार आहोत.असे प्रतिपादन स्माजसेविका सौ.अंजुम सुहास कांदे यांनी केले.
    जागतिक महिला दिन निमित्ताने मतदार संघातील महिलांना व त्यांच्या कुटंबातील सदस्याच्या सुखशांतीसाठी खास उज्जैन येथून सिद्ध करून आणलेल्या रुद्राक्ष वाटप व महिला मेळावा शहरातील शासकीय विश्रामगृह आवारात आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी सौ.कांदे बोलत होत्या.
     त्या पुढे म्हणाल्या की,आधुनिक पद्धतीचा अवलंब करून अर्ध्या हळकुंडात पिवळे होण्यापेक्षा देवाने आपल्याला ज्या उद्देशाने जन्माला घातले आहे.ते उद्दिष्ट पूर्ण करणे होय.स्त्री ला ईश्वराने ज्या - ज्या देणग्या दिल्या आहेत.त्या पुरुषाला दिल्या नाहीत.म्हणजेच आपण स्पेशल आहोत.याची जाणीव ठेवून आपण राहिले पाहिजे.आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या कुटंबाला आर्थिक दृष्ट्या हातभार लावावा.असा उद्योग येत्या काही दिवसात आमदार अण्णा व मी सुरु करणार आहोत,आणि यासाठी शासनाची कुठलीही मदत न मागता स्वखर्चाने या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणार आहोत.असे ही सौ.कांदे शेवटी म्हणाल्या.यावेळी सौ.कुलकर्णी,सौ.मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
    याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.श्रद्धाताई कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख सौ.उज्वला ताई खाडे, तालुकाप्रमुख विद्याताई जगताप,सौ.रोहिणी मोरे,सौ.संगीता बागुल,पूजा छाजेड,अश्विनी पाटील,मनीषा इंगळे,भारती फुके,निर्मला वाघ,तबसूम शेख,माया शेळके,निशा चव्हाण,रेणुका बाहीकर, भारती बागोरे,जान्हवी शर्मा,जयश्री डोळे,नेहा कोळगे, आदिंसह शेकडो महिला उपस्थित होत्या.सूत्रसंचालन व प्रास्तविक अँड.विद्या कसबे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक