आ.सुहास अण्णांच्या मार्गदर्शनाखाली मस्तानी अम्मा उरूस यंदा नेत्रदीपक ठरणार -: युवा सेनेचे सागर हिरे .!
सा.शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक) संतोष कांदे
नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास अण्णांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मस्तानी अम्मा उरूस चा सोहळा यंदा नेत्रदीपक ठरणार असे प्रतिपादन नवनियुक्त अध्यक्ष तथा आ.सुहास कांदे यांचे समर्थक सागर हिरे यांनी केले.
स्वतः उपाशी राहून गरजवंतांची भूक भागवणारी अम्मा नांदगावकर अजून ही विसरलेले नाहीत.त्यामुळे हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शहरातील मान्यवर व्यक्तीची निवड केली जाते.यंदा ही तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांचे समर्थक तथा युवा सेनेचे तालुकाध्यक्ष सागर हिरे यांची निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी मस्तानी अम्मा दर्गा चे व्यवस्थापक व प्रिया निळ चे संचालक शकील शेख, कमिटीचे ज्येष्ठ पंच देविदास मोरे,संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. सदर बैठकीस नांदगांव शहरातील तमाम हिन्दु-मुस्लीम मस्तानी अम्मा भाविक व हिन्दु-मुस्लीम पंच कमिटीचे कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment