माझ्या शेतकरी बांधवांसाठी कांद्यावर प्रक्रिया करणारा उद्योग स्वतःच्या पैशाने उभारणार -आ. सुहास कांदे

सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
पोटच्या लेकराप्रमाणे कांदा पिकाची जपणूक करणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांची कमी दरावरून सतत अव्हेलना होत असते. यावर ठोस उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे. म्हणून कांद्यावर प्रक्रिया करणारा उद्योग मतदार संघात उभा करण्याबाबत माझा कृषीतज्ञ,विविध कंपन्याशी पत्रव्यवहार सुरु असल्याचे प्रतिपादन आ. सुहास कांदे यांनी केले.
   महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचार निमित्त मतदार संघातील साडे सहा जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा क्रमानुसार घेतला जात आहे. भालूर गटातील मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
      व्यासपीठावर माजी आ. संजय पवार,शाईनाथ गिडगे,सतीश पाटील, प्रकाश घुगे, राजेंद्र पवार, बबलू पाटील, राजेंद्र देशमुख, नंदू पाटील, राजाभाऊ पवार, बाळासाहेब आव्हाड, संजय आहेर, किशोर लहाने,सौ. अंजुमताई कांदे,संगीताताई बागुल, श्रद्धाताई कुलकर्णी उपस्थित होत्या.
     मी एक शून्य होतो. पण तुम्ही मतदानरूपी आशीर्वाद देऊन मला आमदार केले. हे तुमचे ऋण मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही. विकास किती केला व झाला. हे मी सांगण्याची वेळ तुम्ही माझ्यावर येऊ देत नाही. तुम्हीच ते सांगून टाकतात. विकास होत राहील. मात्र ज्या कांदा पिकाची माझा शेतकरी बांधव सोन्याप्रमाणे निगा राखतो. घरातील सर्व जमापुंजी तसेच वेळप्रसंगी माता,भगिनी चे मंगळसूत्र ही मोडायला मागेपुढे पहात नाही.याची जाणीव सतत मला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून कांदा पिकावर प्रक्रिया उद्योग उभारून शाश्वत भाव मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. यासाठी फक्त तुमचे प्रेम व आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असू द्या. मी रक्ताचा शेवटचा थेंब माझ्या शरीरात असेपर्यंत तुमची सेवा करत राहीन असे भावनिक आवाहन आमदार सुहास कांदे यांनी यावेळी केले.त्याचबरोबर भारतीताई पवार यांना मताधिक्य देऊन आपली राजकीय इज्जत वाचवण्याची मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो.तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा.! मी पश्चातापाची वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही. असे आ. श्री. कांदे शेवटी म्हणाले.
     संजय आहेर, राजेंद्र देशमुख, अंकुश कातकडे, डॉ. संजय सांगळे, प्रकाश घुगे, सतीश पाटील, राजेंद्र पवार, माजी आ. संजय पवार, सौ. अंजुमताई कांदे, शाईनाथ गिडगे, यांनी आपल्या मनोगतातुन महायुतीच्या  उमेदवार डॉ. भारतीताई पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
     कार्यक्रमास ज्ञानेश्वर कांदे, कैलास फुलमाळी, विजय कदम, देविदास मार्कड, विश्वास आहेर,राजू सांगळे, काळू शिंदे, रोहिणी मोरे, पूजा छाजेड, भारती बागोरे, प्रल्हाद चव्हाण, सुनीता महाले, संदीप आहेर, निशा चव्हाण, योगिता बच्छाव, लक्ष्मण बोगीर,प्रमोद भाबड, सागर हिरे,किरण देवरे,सुनील जाधव,भावराव बागुल, प्रकाश शिंदे, शशी सोनावणे,आदी सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल नावंदर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक