कातडयाच्या चपला बनवून दिल्या तरी तुमचे उपकार फिटणार नाही.! आ. सुहास कांदे

सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
तुमचे म्हणणे खरे मानले की, डॉ. भारती ताई नी कांदा प्रश्नांवर काही केले नाही. मग मला सांगा भगरे तरी कुठे आले.? किंवा त्यांनी विरोधक म्हणून तुमच्यासाठी काही आंदोलन केले का.? असा सवाल करत माझी कॉलर मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे ताठ राहावी म्हणून भारती ताईंना भरघोस मतदान करा. असे आवाहन आ. सुहास कांदे यांनी केले.
  मतदार संघातील कळवाडी, निमगाव, व सोनज गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा कौळाने परिसरातील रितेशराजे लॉन्सवर अफाट गर्दीच्या साक्षीने पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना आ. श्री. कांदे बोलत होते.
     आम्हाला कायम सापत्न भावाची वागणूक मिळत असल्याची, तसेच यापूर्वी विकास काय असतो. याबाबत आम्ही अनभिज्ञ असल्याचे वक्तव्य अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले.तोच धागा पकडून आमदार सुहास कांदे म्हणाले की, या तीन गटांनी सुरुवातीपासून जो लीड दिला तो शेवटपर्यंत टिकला आणि म्हणून मी आमदार होऊ शकलो. या बदल्यात मी कितीही विकासकामे या भागात केली तरी ते मला कमीच वाटतात.
    जमलेली अफाट गर्दी बघून आ. श्री. कांदे काही क्षण भावुक झाले.माझ्या कातडंयाच्या चपला शिवून तुम्हाला दिल्या तरी तुमचे उपकार फिटणार नाही. वेळ कुणाचीही बसून राहत नाही.मी कोणत्या - कोणत्या प्रसंगातून गेलोय. हे फक्त मला माहित आहे. पण असो. मी कुणावर ही राग धरलेला नाही. सर्व विसरून गेलो आहे. आता तुमच्यासाठी काय -काय करता येईल. इतकाच विचार माझ्या मनात सुरु असतो.म्हणूनच विकासकामांसह शिधापत्रिका, जातींचे दाखले व अन्य शैक्षणिक कागदपत्रे,निराधार,जेष्ठ व्यक्तींना दरमहा शासकीय आर्थिक मदत, आरोग्य सुविधा,डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रिया व चष्मे,रुग्णवाहीका, या सह अनेक उपक्रम तुमच्यासाठीच राबवत आहे. आणि हे सर्व करत असताना आमच्या पक्षासह, भाजपच्या मंत्र्यांचे ही मोठे सहकार्य मला मिळाले म्हणून मी हे सर्व करू शकलो. म्हणून त्यांच्याकडे माझी इज्जत टिकून रहावी. म्हणून महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती ताईला भरघोस मतदान करावे असे आवाहन ही त्यांनी शेवटी केले.
    यावेळी व्यासपीठावर या तिन्ही गटातील प्रमुख नेते, सरपंच, सदस्य, सोसायटी चेयरमन, व्हा. चेयरमन, सदस्य शिवसैनिक, महिला आघाडी च्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक