आ. सुहास कांदे खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे नेतृत्व.! उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
मतदार संघात साडे तीन हजार कोटींचा निधी आणून सर्वांगीण विकास करणारे आमदार सुहास कांदे खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे नायक आहेत. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महायुतीच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यासाठी मनमाड शहरातील वाल्मिकी स्टेडियमवर आयोजित विराट सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी मंत्री पंकजाताई मुंडे,आमदार सुहास कांदे, उमेदवार भारती पवार, माजी खासदार डॉ. विकास महात्मे,विजया राहाटकर, विजय चौधरी, माजी आमदार संजय पवार, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
ना. फडणवीस पुढे म्हणाले की, आमदार सुहास कांदे एक वेगळेच व्यक्तिमत्व आहे.गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे काम मी बघतोय. मतदार संघात त्यांनी केलेला कायापालट, मनमाड पाणी योजना पूर्णतःवास आली आहे.मनमाड औद्योगिक वसाहत चे काम सुरु झाले आहे. येथे मोठ्या कंपन्या आणण्याची जबाबदारी मी घेतली आहे.माळमाथा परिसरासाठी गिरणा व झाडी धरणाचे पाणी देण्याची जबाबदारी ही मी घेतो आहे. त्यांच्यात जी विकासाची तळमळ दिसते. त्यामुळे त्यांच्या पत्रावर वर नं बघता आम्ही सह्या करतो. आणि मी अन मुख्यमंत्री ना. शिंदे साहेब त्यांच्यासाठी बेयरर चेक आहोत.यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका करताना कौरवाची उपमा दिली, तसेच त्यांची सत्ता आली तर पंतप्रधान पद संगीत खुर्चीचा खेळ होईल असे ही ते म्हणाले.
माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनीही आमदार सुहास कांदे यांच्या मतदार संघात केलेल्या कामाची तारीफ केली. तर आमदार सुहास कांदे बोलताना म्हणाले की, मतदार संघाचा विकास करताना यापूर्वी मला खूप अडचणी आल्यात. मात्र मुख्यमंत्री ना. शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना. फडणवीस साहेब यांच्या हातात सूत्रे आल्यानंतर अवघ्या दोन अडीच वर्षात साडे तीन हजार कोटींची कामे मतदार संघात करू शकलो. मग त्यात मनमाड करंजवन पाणी योजना,ग्रामीण भागासाठी ७८ खेडी पाणी योजना, नांदगाव शहरासाठी गिरणा धरण व माणिकपुंज धरणातून अशा दोन स्वतंत्र पाणी योजना, शिवसृष्टी, स्टेडीयम,छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता अहिल्यादेवी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे, यांचे पुतळे तसेच जैन बांधवांसाठी अहिंसा चौक, व नियोजित लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा, क्रांतिवीर वसंतराव नाईक यांचा पुतळा,या सह गावागावात वीर एकलव्य यांचे पुतळे व त्यासमोर सभामंडप अशी सामाजिक अस्मिता जोपासून विकास करत आहे. असे आ. श्री. कांदे शेवटी म्हणाले. कार्यक्रमास विराट अशी गर्दी झाल्याने पूर्ण स्टेडीयम भरून गेले होते.
Comments
Post a Comment