माझ्या तालुक्यातील सर्व माता, भगिनींना स्वयंपूर्ण बनवणार.! - सौ. अंजुम कांदे

सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
आपल्या मतदार संघातील माझ्या गरजवंत माता, भगिनींना इच्छित स्थळी बिगर भांडवली स्वयंरोजगार प्राप्त करून देण्यासाठी मी स्वतः ७ ते आठ कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे प्रतिपादन सौ.अंजुम सुहास कांदे यांनी केले.
     शहरातील हनुमाननगर येथील देवाज बंगल्यावर तालुक्यातील गरजू महिलांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार सुहास कांदे,अँड. श्रद्धा जोशी -कुलकर्णी, सौ. उज्वला खाडे, श्रीमती विद्या जगताप,अँड. विद्या कसबे,सौ. संगीता बागुल, सौ. रोहिणी मोरे, सौ. मंगला नावंदर, सविता गिडगे, नजमा मिर्झा, आदी उपस्थित होते.
    सौ. कांदे पुढे म्हणाल्या की, तालुक्यात बचत गटाच्या माध्यमातून तुटपुंजे प्रयत्न करत आपल्या संसाराचा गाडा ओढण्याची केविलवाणी धडपड मी स्वतः बघितली.या महिलांसाठी ठोस उपाययोजना केली पाहिजे. अशी खूणगाठ मनाशी बांधून आमदार सुहास अण्णांच्या मदतीने अनेक कंपन्यांशी संपर्क साधून चर्चा केली. अनेकांचा होकार मिळताच पहिल्या टप्यात किमान १० ते १५ हजार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वतः ७ ते ८ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
     आ. सुहास कांदे म्हणाले की, माझ्या घरात माझ्या पत्नी साठी सर्व ऐशोराम असताना मी जनतेसाठी करत असलेले काम बघून तिने तालुक्यातील महिलांसाठी काम करण्याची इच्छा प्रकट केली. तिची मनापासून ची तळमळ बघून मी ही होकार दिला. गेल्या चार पाच वर्षात तिने पूर्ण तालुका पिंजून काढला. महिलांचे प्रश्न, अडचणी समजून घेतल्या. व त्या काय काय करू शकतात. याचा सखोल अभ्यास केला. म्हणून आपण ही या माझ्या बैहिनींना, त्यांच्या संसाराला आर्थिक फायदा होईल अशा गोष्टी करण्यास सौ. अंजुम यांना मदत केली पाहिजे.असा हेतू ठेवून महिला उद्योगाची सुरुवात करण्यास हिरवा कंदील दिला आहे. सौ. अंजुम यांच्या या समाजपयोगी कामात पूर्ण साथ देणार असल्याचे आ. श्री. कांदे शेवटी म्हणाले.
     यावेळी या उद्योगासाठी समन्व्यक म्हणून काम करत असलेले रविराज भालेराव यांनी उपस्थित हजारो महिलांना सदर कामाचे स्वरूप, मिळणारा मोबदला, या बाबत सखोल मार्गदर्शन केले.
   यावेळी पूजा छाजेड, भारती बागोरे, सुनीता महाले, भारती बोरसे, मनीषा इंगळे, निशा चव्हाण, वनिता बोरसे, आदीसह हजारो महिला उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक